हिमंता बिस्वा सरमा 14 जाहीर सभा घेणार, अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 08:24 PM2023-06-01T20:24:22+5:302023-06-01T20:24:50+5:30
Lok Sabha Elections 2024: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही जाहीर सभा घेण्याची जबाबदारी घेतली आहे.
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. यासोबतच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. मोदी सरकारचे यश जनतेपर्यंत पोहोचावे, यासाठी देशव्यापी कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जात आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये मोर्चे काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही जाहीर सभा घेण्याची जबाबदारी घेतली आहे.
गुरुवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, "11 ते 20 जून या कालावधीत आम्ही मोदी सरकारची 9 वर्षे आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघात 14 जाहीर सभा घेणार आहोत. काही सभांना मी उपस्थित राहणार आहे, तर काही सभांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष भाबेश कलिता आणि केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल व रामेश्वर तेली उपस्थित राहणार आहेत."
याचबरोबर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले की, "प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आम्ही जनसंपर्क अभियानांतर्गत किमान 1400 कुटुंबांना भेटणार आहोत." दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सत्ताधारी भाजपने आतापासूनच तयारी केली आहे. मोदी सरकारच्या नऊ वर्षातील उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्याद्वारे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मजबूत वातावरण निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.