Kailash Vijayvargiya : "कमलनाथ यांनी स्वत:ची जागा वाचवली तरी..." कैलाश विजयवर्गीय यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:52 AM2024-04-04T11:52:38+5:302024-04-04T12:01:31+5:30

Lok Sabha Elections 2024 Kailash Vijayvargiya And Kamalnath : कैलाश विजयवर्गीय यांनीही मीडियासमोर आपलं मत व्यक्त केलं.

Lok Sabha Elections 2024 kailash vijayvargiya target on kamalnath congress on chhindwara | Kailash Vijayvargiya : "कमलनाथ यांनी स्वत:ची जागा वाचवली तरी..." कैलाश विजयवर्गीय यांचा खोचक टोला

Kailash Vijayvargiya : "कमलनाथ यांनी स्वत:ची जागा वाचवली तरी..." कैलाश विजयवर्गीय यांचा खोचक टोला

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बुधवारी इंदूरला पोहोचले. जिथे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत स्थानिक नेत्यांना विजयाचा मंत्र दिला. यावेळी जेपी नड्डा यांनी पक्षाचे अधिकारी आणि मंत्री, आमदार आणि रतलाम, खंडवा, खरगोन, धार आणि इंदूर येथील उमेदवारांशी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत चारशेहून अधिक जागा जिंकून पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान कसे करता येईल यावर जोर दिला.

कैलाश विजयवर्गीय यांनीही मीडियासमोर आपलं मत व्यक्त केलं. कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, "लोकसभेच्या प्रत्येक जागेची माहिती आणि आतापर्यंत कोणती तयारी करण्यात आली आहे यावर चर्चा करण्यात आली आहे. भाजपामध्ये संघटन महत्त्वाचे आहे, त्यामुळेच राष्ट्रीय अध्यक्ष सर्व संघटना कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत."

"छिंदवाडामधून पाच लाखांहून अधिक मतांनी विजयी होण्याचे माझे लक्ष्य आहे, मात्र त्याहून अधिक मतांनी आम्ही तेथे विजयी होऊ." मध्य प्रदेशात 12 जागा जिंकल्याच्या कमलनाथ यांच्या दाव्यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. कमलनाथ यांनी स्वत:ची जागा वाचवली तरी बस झालं असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

कैलाश विजयवर्गीय यांनी यावेळी कमलनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या व्यवस्थापनात कार्यकर्ता जबाबदार असतो. छिंदवाडा लोकसभा जागेबाबत कैलाश विजयवर्गीय यांनी दावा केला की, यावेळी आम्ही छिंदवाडा लोकसभा मतदारसंघ 200 टक्के जिंकू.
 

Web Title: Lok Sabha Elections 2024 kailash vijayvargiya target on kamalnath congress on chhindwara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.