अस्तित्व, प्रभाव अन्  प्रतिष्ठेचा तिरंगी सामना; पप्पू यादव यांची अग्निपरीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 05:30 AM2024-04-19T05:30:35+5:302024-04-19T05:30:53+5:30

पप्पू यादव यांनी पुर्णीयाचा बेटा असा अस्मितेचा प्रश्न उभा केला असून त्यांची उमेदवारीचा फटका किती यावर निकाल ठरेल.

lok sabha elections 2024 Triad of Existence, Influence and Prestige Pappu Yadav's ordeal | अस्तित्व, प्रभाव अन्  प्रतिष्ठेचा तिरंगी सामना; पप्पू यादव यांची अग्निपरीक्षा

अस्तित्व, प्रभाव अन्  प्रतिष्ठेचा तिरंगी सामना; पप्पू यादव यांची अग्निपरीक्षा

राजेश शेगाेकार, लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा
: सलग दाेन वेळा विजय मिळविणारे जेडीयुचे संताेषकुमार कुशवाह यांच्या प्रभावाची, जेडीयु साेडून राजदच्या तिकिटावर उभा असलेल्या बीमा भारती यांची सलग पाच वेळा आमदारकीची प्रतिष्ठा अन् जन अधिकार पार्टी काॅंग्रेसमध्ये
विलीन करूनही उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्या अस्तित्वाच्या लढाईचा तिरंगी सामना पूर्णीया मतदारसंघात हाेत आहे.
 
कुशवाहांसाठी स्व:ता माेदींनी सभा घेतली. लालु प्रसाद यादव यांनी पप्पू यादवांचा गेम केल्यानंतर बिमा भारतींच्या अर्ज दाखल करण्यापासून तेजस्वी यादव येथे सक्रीय आहेत. पप्पू यादव यांच्या बंडामुळे काॅंग्रेसमध्ये मतविभाजन अटळ मानेल जाते त्यामुळे यादव, मुस्लीम मतांवर राजद डाेळा असून भाजप व जेडीयूची मतपेढी एनडीएची ताकद आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • पप्पू यादव यांनी पुर्णीयाचा बेटा असा अस्मितेचा प्रश्न उभा केला असून त्यांची उमेदवारीचा फटका किती यावर निकाल ठरेल.
  • मागासवर्गीयांची मतपेढी जेडीयु व भाजप कायम ठेवणार की बिमा भारती नुकसान पाेहचविणार
  • येथील रस्ते, राेजगारासह गेल्या आठ वर्षापासून कागदावरच असलेले विमातळ चर्चेत आहे. पंतप्रधानांनी या सुविधांचे दिलेले आश्वासन महत्वाचे ठरू शकते.

२०१९ मध्ये काय घडले ?
संताेषकुमार जेडीयु (विजयी) ६,३२,९२४ 
उदय सिंह काॅंग्रेस ३,६९,४६३

Web Title: lok sabha elections 2024 Triad of Existence, Influence and Prestige Pappu Yadav's ordeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.