Lok Sabha Elections 2024: महापुराच्या आव्हानात कुणाची नाैका किनारी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:15 AM2024-04-16T06:15:07+5:302024-04-16T06:16:50+5:30

द्रमुक प्रबळ, पण युवा नेत्यांचेही कनिमाेझी यांना तगडे आव्हान

lok sabha elections 2024 Who is the heroine in the challenge of the flood | Lok Sabha Elections 2024: महापुराच्या आव्हानात कुणाची नाैका किनारी? 

Lok Sabha Elections 2024: महापुराच्या आव्हानात कुणाची नाैका किनारी? 

असिफ कुरणे, लोकमत न्यूज नेटवर्क
चेन्नई
: द्रमुक पक्षाच्या उप महासचिव  व माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या कन्या कनिमोझी या दुसऱ्यांदा तुतुकोडी मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. यावेळी अण्णाद्रमूकचे युवा नेता शिवसामी वेलुमणी आणि तामिळ मनिला काँग्रेसच्या एसडीआर विजयासीलन यांचे तगडे आव्हान कनिमोझी यांच्यासमोर आहे.  राष्ट्रीय मुद्द्यांसोबत स्थानिक मुद्दे देखील प्रचारात महत्त्वाचे ठरत आहेत.

मतदारसंघात नाडर, दलित, मुकूलथोरस, मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. शिवसामी वेलुमणि आणि विजयासीलन सारख्या युवा नेत्यांनी कनिमोझी यांना प्रचारासाठी फिरण्याची वेळ आणली आहे.   पुरामुळे झालेले नुकसान, पायाभूत सुविधांची दुरावस्था , पिण्याचे स्वच्छ पाणी अशा गोष्टींची ग्रामीण भागात  समस्या आहे. तर शहरी भागात प्रदूषण कळीचा मुद्दा आहे.   

२०१९ व २०२१च्या निवडणुकीत स्टरलाईट प्रकल्पाचा मुद्दा कळीचा विषय होता. या प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनावेळी पोलिस गोळीबारात १३ आंदोलकांचा बळी गेला होता. पण आता हा मुद्दा पूर्णपणे थंड्या बस्त्यात गेल्यासारखी स्थिती आहे. पण त्यावरून राजकारण आजही सुरु आहे. 

निवडणुकीत कळीचे मुद्दे 

  • गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आलेल्या पुराचा फटका या मतदारसंघातील अनेक गावांना बसला होता.  अनेक कुटुंबियांना आपला निवारा गमवावा लागला होता. मात्र सरकारकडून पुर्नवसन, मदत झाली नाही याबाबत नाराजी. 
  • तुतुकोडी येथील फर्निचर पार्क आणि कन्याकुमारीतील विमानतळाचे विस्तारीकरण लवकर व्हावे अशी येथील मतदारांची मागणी आहे. त्याचप्रमाणे प्रदूषणाचा विषय देखील ऐरणीवर आहे.
  • मतदारसंघात औद्योगिककरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. पण स्थानिकांना रोजगार वाढवणारे अत्याधुनिक मॉर्डन उद्योग जिल्ह्यात यावे असे वाटते. 

एकूण मतदार    १४,४८,१७९
पुरुष - ७,०८,२४४
महिला - ७,३९,७२०

२०१९ मध्ये काय घडले?
कनिमोझी करुणानिधी द्रमूक (विजयी) ५,६३,१४३ 
तामिलसाई सुंदरराजन भाजप २,१५,९३४  

२०१९ पूर्वी कोणाची बाजी?
वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     

२०१४    जे. नट्टरजी        अण्णाद्रमूक    ३,६६,०५२
२००९    एस. जयादुराई    द्रमूक    ३,११,०१७

Web Title: lok sabha elections 2024 Who is the heroine in the challenge of the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.