'2014तल्या यूपी निकालांसारखे यंदा बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 04:21 PM2019-05-20T16:21:40+5:302019-05-20T16:21:55+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी एक्झिट पोल जारी करण्यात आले.
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी एक्झिट पोल जारी करण्यात आले. यातील अनेक एक्झिट पोलमधून एनडीएला बहुमत मिळत असल्याचं दाखवण्यात आलं. या निवडणुकीत पश्चिम बंगाल फार चर्चेत राहिलं. भाजपानंही पश्चिम बंगालवर विशेष लक्ष दिलं होतं. एनडीटीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाला 24 जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. यंदा भाजपाला पश्चिम बंगालमध्ये 24 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस एक ते दोन जागांवर विजयी होईल. एक्झिट पोलचे निकाल समोर येताच भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव म्हणाले, बंगालमधल्या निवडणूक पंडितांना तिकडचे निकाल हैराण करणारे असतील.
Ram Madhav, BJP National General Secretary: Bengal will surprise all the pollsters, we are hoping to do extremely well there. Everyone has seen the tremendous outpouring of support for PM Modi & BJP in Bengal. What Uttar Pradesh was in 2014, Bengal will be in 2019. pic.twitter.com/xGixMOYcOa
— ANI (@ANI) May 20, 2019
तिथे आम्ही चांगले प्रदर्शन करत आहोत. प. बंगालमध्ये ज्या पद्धतीनं मोदी आणि भाजपानं शानदार प्रदर्शन केलं आहे. जे 2014च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये झालं होतं. तसेच निकाल 2019मध्ये पश्चिम बंगालमध्ये लागतील. ममता बॅनर्जींनी या एक्झिट पोलचे निकाल खरे होत नसल्याचं सांगितलं आहे. ईव्हीएममध्ये गडबड करून असे निकाल लावले जातात. तर त्याला भाजपानंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जींनी स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर पडावं आणि सत्य परिस्थिती ओळखावी, असंही म्हटलं आहे.