नेते घरात अन् कार्यकर्ते उन्हात, प्रचारासाठी उमेदवाराने चक्क पुतळाच फिरवला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 08:10 PM2019-04-28T20:10:59+5:302019-04-28T20:11:42+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाच्याला लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरवले आहे.
कोलकाता - लोकसभा निवडणुकांचा प्रचारही उन्हाप्रमाणेच तापल्याचे दिसून येत आहे. देशात काही किरकोळ घटना वगळता पहिल्या तीन टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले आहे. सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने चक्क स्वत:चा पुतळाच मतदारसंघात फिरवला आहे. उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तृणमूलचे उमेदवार अभिषेक बॅनर्जी यांनी ही शक्कल लढवली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाच्याला लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरवले आहे. येथील डायमंड हार्बर मतदार संघातून अभिषेक बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. या मतदार संघात प्रचार करताना त्यांनी उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी चक्क पुतळ्याचा वापर केला आहे. एका जिप्सी कारमध्ये अभिषेक यांचा पुतळा आहे. या जिप्सीतून डायमंड हार्बर मतदार संघात प्रचार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रचारात नेत्याचे उन्हापासून संरक्षण होत असले तरी, कार्यकर्त्यांची मात्र उन्हामुळे लाही लाही होत आहे.
सध्या, पश्चिम बंगालमधील सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तर, बॅनर्जी यांनी प्रचारासाठी सर्वत्र जाण्यास वेळ नसल्यामुळे हा पुतळा बनविल्याचं म्हटलं आहे. पण, उन्हामुळे त्रास होत असल्याने कार्यकर्त्यांच्या सहभागानेच प्रचार करण्याची ही अनोखी शक्कल असल्याची चर्चा सोशल मीडियात होत आहे. दरम्यान, या मतदारसंघात 19 मे रोजी अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे.
To avoid scorching heat, TMC Diamond Harbour Candidate & Mamata's Nephew Abhishek Banerjee found an innovative solution
— 💂 Rishi Bagree 🇮🇳 (@rishibagree) April 26, 2019
- Using his own statute for Campaigning 🤣😂 pic.twitter.com/ZaRAG55gcZ