हनीट्रॅपमध्ये अडकले लोकसभा खासदार, 5 कोटींची मागणी

By admin | Published: May 1, 2017 07:56 AM2017-05-01T07:56:33+5:302017-05-01T11:02:44+5:30

लोकसभेच्या एका खासदाराने दिल्ली पोलिसांत हायप्रोफाईल महिलेने हनीट्रॅप केलं असल्याची तक्रार केली आहे

Lok Sabha MP from Hanitrap, demanded Rs 5 crore | हनीट्रॅपमध्ये अडकले लोकसभा खासदार, 5 कोटींची मागणी

हनीट्रॅपमध्ये अडकले लोकसभा खासदार, 5 कोटींची मागणी

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - लोकसभेच्या एका खासदाराने दिल्ली पोलिसांत हायप्रोफाईल महिलेने हनीट्रॅप केलं असल्याची तक्रार केली आहे. महिलेने घरी बोलावून पेयात गुंगीचे औषध मिसळून आपल्याला बेशुद्ध केलं, आणि त्यानंतर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढले असल्याचा आरोप खासदाराने केला आहे. महिला आता आपल्याला ब्लॅकमेल करत असून पाच कोटींची मागणी करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. खासदाराने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महिलेचा शोध सुरु करण्यात आला आहे. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेसोबत अजून काही लोक सामील असून त्यांची एक गँग आहे. या गँगने खासदाराला धमकी दिली आहे की जर त्याने पाच कोटींची रक्कम दिली नाही, तर सर्व फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक करण्यात येतील. इतकंच नाही तर बलात्काराच्या आरोपाखाली फसवण्याची धमकीही दिली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त मुकेश मीना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. 
 
आपल्या तक्रारीत खासदाराने दावा केला आहे की, आरोपी महिलेने त्यांच्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर गाजियाबादमधील घरी चलण्यास सांगितलं होतं. तिथे पोहोचल्यावर गुंगीचं औषध मिसळलेलं शीतपेय दिलं, ज्यानंतर बेशुद्ध झालो. शुद्धीत आल्यानंतर आपल्याला फसवलं गेलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. 
 
खासदाराने तक्रार केल्यानंतर दिल्ली पोलीस आयुक्तांनी तात्काळ याप्रकरणी तक्रार नोंद करत तपास करण्याचा आदेश दिला. दिल्ली पोलिसांचं एक विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. गरज पडल्यास क्राईम ब्रांत किंवा स्पेशल सेलकडे हे प्रकरण सोपवलं जाऊ शकतं. 
 

Web Title: Lok Sabha MP from Hanitrap, demanded Rs 5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.