१५ वर्षांत दुपटीने वाढले लोकसभेचे पक्ष; यंदा अपक्षांसह ७५१ पक्षांतील ८,३६० उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 01:05 PM2024-05-30T13:05:14+5:302024-05-30T13:05:33+5:30
यंदाची लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: यंदाची लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यात अनेक राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही नशीब आजमावले. २००९ ते २०२४ या १५ वर्षांत लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या पक्षांची संख्या तब्बल १०४ टक्के वाढल्याची माहिती एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालात दिली आहे. २००९ मध्ये ३६८ पक्षांनी, तर २०२४ मध्ये सुमारे ७५१ पक्षांनी निवडणूक लढविल्याचे त्यात नमूद केले आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण ८३६० उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी एडीआरने ८३३७ उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण केले.