'बटण हत्तीचं दाबलं पण चिठ्ठी कमळाचीच बाहेर आली, मतदारांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 10:13 AM2019-04-12T10:13:34+5:302019-04-12T10:15:14+5:30

आंध्र प्रदेशमध्ये 100 ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचे सांगत पुन्हा मतदान घेण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.

Lok Sabha polls 2019: Residents claim EVM glitch, allege votes credited to BJP automatically | 'बटण हत्तीचं दाबलं पण चिठ्ठी कमळाचीच बाहेर आली, मतदारांचा गंभीर आरोप

'बटण हत्तीचं दाबलं पण चिठ्ठी कमळाचीच बाहेर आली, मतदारांचा गंभीर आरोप

googlenewsNext

लखनौ - लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच देशातील 91 मतदारसंघात मतदान घेण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांसह दक्षिण आणि उत्तर भारतातही मतदानप्रकिया पार पडली. मात्र, बहुतांश ठिकाणी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला BSP मतदान केल्यास, ते मत भाजपाला मिळत असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे. 

आंध्र प्रदेशमध्ये 100 ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचे सांगत पुन्हा मतदान घेण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. तर, जम्मू आणि काश्मीरच्या पुँछ येथे काँग्रेसचे बटणच दाबले जात नसल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन केला आहे. त्यानंतर, आता उत्तर प्रदेशच्या बिजनौर लोकसभा मतदारसंघातील मीरापुर आणि कैराना क्षेत्रातील एका बुथवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हत्तीचे बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी व्हीव्हीपॅट मशिनमधून बाहेर पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

याबाबत समजताच सपा-बसपा आघाडीचे उमेदवारही घटनास्थळी पोहोचले होते. कसौली येथील बुथ क्रमांक 16 येथे हत्तीचे चिन्ह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकाचे बटण दाबल्यानंतरही चौथे आणि पाचवे मतदान कमळाच्या चिन्हाला मिळत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.  

मतदारांनी आरोप केला आहे की, 5 ते 7 मतदार मतदानासाठी गेले होते. मात्र, हत्तीसमोरील बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी बाहेर येत असल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी बुथवरील निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रारही करण्यात आली. तसेच तेथील उमेदवार मलूक नागर यांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली. 'मला मिळालेल्या माहितीनुसार, चौथ्या ते पाचव्या क्रमांकाचे मत भाजपाला मिळत आहे, काहीवेळा सलगही मतदान केल्यास व्हीव्हीपॅट मशिनमधून कमळाचीच चिठ्ठी बाहेर येत होती, असे बसपचे उमेदवार मलूक नागर यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी बिजनोर क्षेत्राचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी राकेश कुमार यांनी हे वृत्त फेटाळले आहे. देशात शांततेत मतदान सुरू आहे. मॉक व्होटींगवेळी अशा काही समस्या जाणवल्या होत्या. त्यामुळे, तात्काळ मशिनचा सेटअप बदलण्यात आल्याचेही कुमार यांनी म्हटले आहे.  
 

Web Title: Lok Sabha polls 2019: Residents claim EVM glitch, allege votes credited to BJP automatically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.