कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 06:38 PM2024-06-03T18:38:37+5:302024-06-03T18:39:21+5:30

Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

Lok Sabha Result 2024: How are the votes counted? What happens to EVM-VVPAT slips? know all details | कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...

कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. उद्या, म्हणजेच 4 जून रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत देशभरातील सर्व निकाल लागतील. या निकालांवर देशासह जगभरातील अनेक देशांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतांची मोजणी कशी केली जाते ? मतमोजणीच्या दिवशी नेमके काय होते? कोण मते मोजतो? मतमोजणीनंतर EVM चे काय होते? अशी अनेक प्रश्ने तुमच्या मनात आली असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत.

मतमोजणीला किती वाजता सुरुवात होणार?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आधी पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाईल आणि नंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाईल. पोस्टल मतपत्रिकेतही दोन गटात मतमोजणी होणार आहे. पहिल्यांदा लष्कर, निमलष्करी दलातील जवानांची मते मोजली जातील आणि नंतर निवडणूक कर्तव्य बजावणारे कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पोस्टल मतांची मोजणी होईल.

पोस्टल मतपत्रिकांची मोजणी कोण सुरू करते?
निवडणूक नियम 1961 च्या नियम 54A अंतर्गत पोस्टल मतपत्रिकांची मोजणी रिटर्निंग ऑफिसर (RO) यांच्या टेबलावर सुरू होईल. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झाल्यानंतर 30 मिनिटांनी ईव्हीएममधून मतमोजणी सुरू होते.

मतमोजणी अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत?
मतदारसंघात पोस्टल मतपत्रिका नसल्यास ईव्हीएमवरुन मतमोजणी निर्धारित वेळेत सुरू करता येईल. मतमोजणीसाठी मतदान केंद्रात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमच्या कंट्रोल युनिट (CU) सोबत फक्त फॉर्म 17C आवश्यक आहे. EVM च्या CU मधून निकाल जाणून घेण्यापूर्वी मतमोजणी अधिकारी त्यांच्या कागदावरील शिक्के तपासतो आणि एकूण मतदान फॉर्म 17C मध्ये नमूद केलेल्या मतांशी जुळत असल्याची खात्री करतो.

निकाल कसा जाहीर होतो?
कंट्रोल युनिटचा निकाल मतमोजणी निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षक आणि उमेदवारांच्या मोजणी प्रतिनिधींना दाखवल्यानंतर फॉर्म 17C च्या भाग-II मध्ये नोंदवला जातो. कंट्रोल युनिटच्या डिस्प्ले पॅनलमध्ये निकाल प्रदर्शित न झाल्यास सर्व CUs ची मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित VVPAT स्लिप्स मोजल्या जातात. प्रत्येक CU चा उमेदवारनिहाय निकाल फॉर्म 17C च्या भाग II मध्ये नोंदवला जातो आणि मतमोजणी निरीक्षक आणि मतमोजणी टेबलावर उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधींची स्वाक्षरी केली जाते.

VVPAT स्लिप्स कधी मोजल्या जातात?
CU मधून मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच VVPAT स्लिपची मोजणी सुरू होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ/लोकसभा मतदारसंघातील निवडलेल्या पाच मतदान केंद्रांच्या VVPAT स्लिपची अनिवार्य पडताळणी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच केली जाते. जेव्हा विजयाचे अंतर रद्द केलेल्या पोस्टल मतपत्रिकांच्या संख्येपेक्षा कमी असेल, तेव्हा अशा सर्व नाकारलेल्या पोस्टल मतपत्रिकांची पुन्हा पडताळणी केली जाते. विशेष म्हणजे, दोन उमेदवारांना समान संख्येने सर्वाधिक मते मिळाल्यास, निकाल लॉटरीद्वारे घोषित केला जातो.

Web Title: Lok Sabha Result 2024: How are the votes counted? What happens to EVM-VVPAT slips? know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.