लोकसभा निवडणूक निकाल २०२४: सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी झालेले Top 5 उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 01:10 PM2024-06-05T13:10:47+5:302024-06-05T13:12:19+5:30

Top 5 candidates with highest victory margin, Lok Sabha Election Result 2024: मोदींचा '४००पार चा नारा' फारसा प्रभावी ठरताना दिसला नाही, पण भाजपच्या अनेक उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवले.

Lok Sabha Result 2024 Top 5 candidates crush record for highest victory margin as BJP Shankar Lalwani tops | लोकसभा निवडणूक निकाल २०२४: सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी झालेले Top 5 उमेदवार

लोकसभा निवडणूक निकाल २०२४: सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी झालेले Top 5 उमेदवार

Top 5 candidates with highest victory margin, Lok Sabha Election Result 2024: देशात गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीचा अखेर काल निकाल लागला. भाजपप्रणित एनडीए ने २९४ जागा जिंकल्या तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला २३२ जागांवर विजय मिळवता आहे. या निवडणुकीत १७ अपक्ष उमेदवारही विजयी झाले. पंतप्रधान मोदी यांनी ४००पार चा नारा दिला होता, त्यात भाजपा सपशेल नापास झाले. पण असे असले तरी, भाजपच्या चार उमेदवारांसह एकूण पाच उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक विजयाचा मागील विक्रम मोडीत काढला.

आतापर्यंत भाजपाच्या प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय मिळवला होता. त्यांनी बीडमधून ऑक्टोबर २०१४ मध्ये ६ लाख ९६ हजारांनी विजय मिळवला होता. तो विक्रम मोडीत काढून देशात पाच उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. पाहूया Top 5 विजय-

१. इंदूरचे विद्यमान खासदार भाजपचे शंकर लालवानी यांनी १० लाख ०८ हजार ०७७ मतांनी विजयी झाले. त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या संजय सोळंकींचा पराभव केला.

२. आसाममधील धुबरी येथून काँग्रेसच्या रकीबुल हुसैन यांचा १० लाख १२ हजार मतांनी विजय मिळवला. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रँटिक फ्रंटच्या मोहम्मद अजमल यांचा लढतीत पराभव झाला.

३. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे विदिशामधून ८ लाख २१ हजारांच्या फरकाने विजयी झाले. काँग्रेसच्या प्रतापभानु शर्मा यांचा चौहान यांनी पराभव केला.

४. भाजपाचे सीआर पाटील यांनी गुजरातमधील नवसारी येथून ७ लाख ७३ हजारांच्या मतांनी विजय मिळवला. काँग्रेसच्या नैषदभाई देसाईंना त्यांनी पराभवाची धूळ चाखायला लावली.

५. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांधीनगरमध्ये ७ लाख ४४ हजार मतांनी दमदार विजय मिळवला. सोनम पटेल यांचा त्यांनी पराभव केला.

Web Title: Lok Sabha Result 2024 Top 5 candidates crush record for highest victory margin as BJP Shankar Lalwani tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.