पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 10:03 PM2019-08-20T22:03:33+5:302019-08-20T22:16:53+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

Lok Sabha Secretariat Bans Use of Plastic in Parliament Complex | पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू

googlenewsNext

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर लोकसभेत मंगळवारपासून प्लॅस्टिकचे साहित्य वापरता येणार नसल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. 

तसेच लोकसभा सचिवालयाने प्लॅस्टिक बॉटल आणि अन्य प्लॅस्टिक साहित्याच्या वापरावर बंदी घालण्याबाबत अंमलबजावणी केली. संसदेतील सर्व विभाग आणि कर्मचा-यांना पर्यावरण पुरक साहित्य आणि पिशवी वापरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २ ऑक्टोबर पासून सर्व सरकारी कार्यालयात प्लॅस्टिक बंदी सक्तीची असणार आहे. 

लोकसभा सचिवालयानं आज लोकसभेत नॉन-फंक्शनल प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि इतर प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यास आजपासून बंदी घातली आहे. लोकसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना आणि संसद भवन संकुलात कार्यरत असलेल्या इतर सहाय्यक एजन्सींना सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच प्लॅस्टिक वस्तूऐवजी पर्यावरणास अनुकूल आणि नैसर्गिक कचर्‍याच्या पिशव्या वापरण्याचे आदेश देण्यात आले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करतांना 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशातील जनतेला प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यास सांगितले. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Web Title: Lok Sabha Secretariat Bans Use of Plastic in Parliament Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.