भयावह कोरोना! देशभरात कहर सुरु; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 03:03 PM2021-03-21T15:03:28+5:302021-03-21T15:04:23+5:30
Corona Virus second wave: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,846 नवीन रुग्ण सापडले आहेत. यापैकी जवळपास 27 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
देशात कोरोनाची दुसरी मोठी लाट सुरु झाली असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,846 नवीन रुग्ण सापडले आहेत. यापैकी जवळपास 27 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,15,99,130 झाली आहे. ("Om Birla was admitted to AIIMS COVID Centre for observation on March 20. He is stable and his parameters are normal," a release by AIIMS read.)
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सलग ११ व्या दिवशी वाढून 3,09,087 एवढी झाली आहे. तर बरे होण्याचा दर घसरून 95.96 राहिला आहे.
राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट 19 मार्चला पॉझिटिव्ह आला असून 30 मार्चला त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालय़ात दाखल करण्यात आले आहे. एम्सने बुलेटीन काढून बिर्ला यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सने म्हटले आहे.
Lok Sabha Speaker Om Birla tested positive for COVID19 on March 19. He was admitted to AIIMS COVID Centre for observation on March 20. He is stable: AIIMS, Delhi pic.twitter.com/nhook5tr83
— ANI (@ANI) March 21, 2021
दैनंदिन रुग्णसंख्येचा राज्यात पुन्हा उच्चांक; मुंबईत दिवसभरात २९६२ रुग्ण
राज्यात सलग दोन दिवस काेराेनाची दैनंदिन रुग्णसंख्या २५ हजारांहून अधिक असल्याची नोंद झाल्याने चिंतेचे वातावरण होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. दिवसभरात २७ हजार १२६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ९२ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ९१ हजार ६ इतकी झाली आहे. राज्यात लॉकडाऊन होऊन वर्षपूर्ती होत असताना कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. दरम्यान, मुंबईत शनिवारी २,९६२ रुग्णांची नाेंद झाली असून, ७ मृत्यू झाले.
राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २४,४९,१४७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ३०० आहे. शनिवारी दिवसभरात १३,५८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत एकूण २२,०३,५५३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९७ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.४४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ७,९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.