लोकसभा झाली अधिक कार्यक्षम

By admin | Published: August 3, 2014 02:13 AM2014-08-03T02:13:17+5:302014-08-03T02:13:17+5:30

सरकारप्रमाणोच संसदेतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. तीन वर्षाची कोंडी आता फुटली आहे आणि सभागृहाच्या पटलावरचे कामकाज वाढत चालले आहे

Lok Sabha was more efficient | लोकसभा झाली अधिक कार्यक्षम

लोकसभा झाली अधिक कार्यक्षम

Next
नवी दिल्ली : सरकारप्रमाणोच संसदेतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. तीन वर्षाची कोंडी आता फुटली आहे आणि सभागृहाच्या पटलावरचे कामकाज वाढत चालले आहे. मागील तीन आठवडय़ांत 16 व्या लोकसभेची कार्यक्षमता 1क्3 टक्के असल्याची नोंद करण्यात आली. याच काळात 15 व्या लोकसभेची कार्यक्षमता फक्त 61 टक्के एवढीच होती.
लोकसभेमध्ये रालोआ सरकारचे बहुमतात असणो हे सभागृहातील कामकाज सुरळीतपणो चालण्यामागचे कारण असू शकेल. खासदारही सभागृहांच्या कामकाजामध्ये मोठय़ा प्रमाणावर सहभागी होत                   आहेत. 
पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांचा सभागृहातील सहभाग विलक्षण आहे. 2क्14 मध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांचा अनुदान मागण्यांवरील चर्चेतील सहभाग वाढून 58 टक्के झाला आहे. म्हणजे 158 नवनिर्वाचित खासदारांनी या चर्चेत सहभाग घेतला. 2क्क्9 मध्ये ही संख्या 1क्क् होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्नवनिर्वाचित खासदारांपैकी 47 टक्के खासदारांची रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेतला, असे पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च या स्वतंत्र संस्थेने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. नव्या खासदारांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होण्याचे प्रमाणही यावेळी वाढले आहे. 
च्2क्क्9 च्या तुलनेत यावेळी 26 टक्के जादा खासदारांनी चर्चेत भाग घेतला. 2क्क्9 आणि 2क्14 या काळात वरिष्ठ खासदारांच्या चर्चेतील सहभागाचे प्रमाण 27 टक्क्यांनी वाढले असले तरी नव्या खासदारांच्या चर्चेतील सहभागाच्या प्रमाणातही 38.5 टक्क्यांर्पयत वाढ झालेली आहे. 

 

Web Title: Lok Sabha was more efficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.