राबड़ी देवींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप ; या प्रश्नांची उत्तरे द्यावी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 02:20 PM2019-05-21T14:20:49+5:302019-05-21T14:26:32+5:30
सीबीआय आणि ईडीप्रमाणे निवडणूक आयोगाने भाजपबरोबर युती केली असून लाज नसल्याप्रमाणे त्यांच्यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप राबड़ी देवींनी लावला आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आला असताना विरोधीपक्ष नेत्यांकडून ईव्हीएम मशीनबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबड़ी देवी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी देशभरातील स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे याआधी सुद्धा विरोधकांनी निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली होती.
देशभरातील स्ट्रॉंग रूमच्या परिसरात ईव्हीएम मशीन सापडत आहेत. ट्रक आणि खाजगी वाहनात ईव्हीएम मशीन पकडल्या जात आहे. त्या ईव्हीएम मशीन कुठून येत आहे, कोठे जात आहे? त्या कोणासाठी नेल्या जात आहे ? हा पूर्वनियोजित प्रक्रियेचा भाग आहे का? ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर निवडणूक आयोगाने त्वरित द्यावे असे राबड़ी देवी म्हणाल्या. सीबीआय आणि ईडीप्रमाणे निवडणूक आयोगाने भाजपबरोबर युती केली असून लाज नसल्याप्रमाणे त्यांच्यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप राबड़ी देवींनी लावला आहे.
ae
देशभर के स्ट्रोंग रूम्स के आसपास ईवीएम की बरामदगी हो रही है। ट्रकों और निजी वाहनों में ईवीएम पकड़ी जा रही है।
— Rabri Devi (@RabriDeviRJD) May 21, 2019
ये कहाँ से आ रही है,कहाँ जा रही है? कब,क्यों,कौन और किसलिए इन्हें ले जा रहा है? क्या यह पूर्व निर्धारित प्रक्रिया का हिस्सा है?चुनाव आयोग को अतिशीघ्र स्पष्ट करना चाहिए।
तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे मतदान करता आले नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी राबड़ी देवींनी लावला. मतदाना यादीत तेजस्वी यांच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीचे फोटो लावण्यात आले होते. याबाबत निवडणूक आयोगाने दोषींवर काय कारवाई केली, हा कुणाचा कट होता याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावे अशी मागणी राबड़ी देवींनी केली.
CBI, ED की तरह चुनाव आयोग ने भाजपा से पहले गठबंधन किया अब उसमें विलय कर बेशर्मी से काम कर रहा है। वोटिंग के दिन @yadavtejashwi को फ़र्ज़ी तरीक़े से फँसाने और बदनाम करने के लिए उसकी जगह किसी और का फ़ोटो लगा दिया गया ताकि बेवजह विवाद उत्पन्न कर नकारात्मकता व विघ्न पैदा किया जाए। pic.twitter.com/kjKvUpjqQl
— Rabri Devi (@RabriDeviRJD) May 21, 2019
माझी मुलगी रोहिणी मतदानाच्या एक दिवस अगोदर सिंगापुर येथून पटन्यात आली. मात्र मतदान यादीत तिचे नाव वगळण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी सांगावे की मतदान यादीतून नाव कसे हटविण्यात आले? असे राबड़ी देवी म्हणाल्या.