बेहिशेबी मालमत्तेचे आरोप; खानापूर तहसीलदारांच्या घरावर छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:43 IST2025-01-09T18:43:33+5:302025-01-09T18:43:33+5:30

बेळगाव : बेहिशेबी मालमत्तेचे आरोप व तक्रारींची दखल घेत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी खानापूरचे तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांच्या निवासस्थानी आणि ...

Lokayukta raids Khanapur Tehsildar Prakash Sridhar Gaikwad's house | बेहिशेबी मालमत्तेचे आरोप; खानापूर तहसीलदारांच्या घरावर छापा

बेहिशेबी मालमत्तेचे आरोप; खानापूर तहसीलदारांच्या घरावर छापा

बेळगाव : बेहिशेबी मालमत्तेचे आरोप व तक्रारींची दखल घेत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी खानापूरचे तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर बुधवारी सकाळी छापे टाकले.

तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या गणेशपूर, बेळगाव येथील निवासस्थानापासून सुरू झालेली लोकायुक्त अधिकाऱ्यांची छापेमारी निपाणी आणि खानापूर येथील त्यांचे कार्यालय व घरापर्यंत गेली. बेळगावचे लोकायुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक (एसपी) हणमंतराय यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली ही कारवाई कोणत्याही प्रतिकार किंवा व्यत्ययाशिवाय पार पडली. लोकायुक्त छाप्याच्या तपासाचा भाग म्हणून महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि रेकॉर्डची छाननी केली जात आहे. 

छापा टाकणाऱ्या लोकायुक्त पथकामध्ये पोलिस उपाधीक्षक पुष्पलता आणि पोलिस निरीक्षक निरंजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. हे लोकायुक्त पथक आरोपांशी संबंधित तपशील उघड करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. लोकायुक्तांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवल्याने या प्रकरणात पुढे आणखी काही घडामोडी अपेक्षित आहेत. दरम्यान, लोकायुक्त पोलिस अधिकाऱ्यांच्या या छाप्यामुळे खानापूर तहसीलदार कार्यालयात खळबळ उडाली आहे.

Web Title: Lokayukta raids Khanapur Tehsildar Prakash Sridhar Gaikwad's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.