मोबाईल जप्त केला म्हणून विद्यार्थाने मुख्याध्यापकाला बदडले लोखंडी रॉडने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 05:35 PM2017-09-12T17:35:06+5:302017-09-12T17:35:06+5:30
मोबाईल जप्त केल्याचा राग मनात ठेवून नववीच्या विद्यार्थाने मुख्याध्यपकांना लोखंडी रॉडने रॉडने मारल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. यमुना विहार भागातील सर्वोद्य बाल विद्यालय या सरकारी शाळेमध्ये हा प्रकार घडला.
नवी दिल्ली, दि. 12 : शिक्षक म्हणजे, आयुष्याला कलाटणी देणारी, दिशा देणारी, कधी पाठीवर शाबासकीचा हात, तर कधी हातावर छडीचा मार देणारी व्यक्ती. पण गुरुवर्यांनाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मोबाईल जप्त केल्याचा राग मनात ठेवून नववीच्या विद्यार्थाने मुख्याध्यपकांना लोखंडी रॉडने रॉडने मारल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. यमुना विहार भागातील सर्वोद्य बाल विद्यालय या सरकारी शाळेमध्ये हा प्रकार घडला. मोबाईल आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्या घटक बनला असला तरी त्याचा आती वापर धोकादायक असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. मोबाईलचे व्यसन लागल्यावर ती व्यक्ती कोणत्या थराला जाईल याचा भरवसा नाही.
नवी दिल्लीत नववीत शिकणाऱ्या विध्यार्थाने लोखंडी रॉडने मुख्याध्यापकांना मारहाण केली असून त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मेवा लाल असे मारहाण करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे. मेवा लाल सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास शाळेमध्ये देखरेख करत असताना नववीतील एक विद्यार्थी शिक्षक वर्गात शिकवत असताना मोबाईलवर काहीतरी करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी लगेचच त्या मुलाला जवळ बोलावून त्याला ओरडले आणि त्याचा मोबाईल जप्त केला. त्याचबरोबर पालकांना भेटायला घेऊन ये, असे बजावले.
संबंधित विद्यार्थ्याने मुख्यध्यापकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व मोबाईल त्यांच्याकडे दिला. पण घडलेल्या प्रकरणाचा राग डोक्यात असल्याने त्याने नंतर शाळेच्या मैदानात मुख्याध्यापकांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे वार त्याने हातापायांवर केले. त्यानंतर तेथे उपस्थित विद्यार्थी आणि शाळेचे कर्मचारी यांनी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्याला अडवले. पण जर त्याला अडवले नसते तर माझा जीव देखील गेला असता, असे मेवा लाल यांनी तक्रारीमध्ये सांगितले आहे.