#BestOf2017 : २०१७ च्या तुमच्या आवडत्या चित्रपटाला मत द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 01:13 PM2017-12-19T13:13:59+5:302017-12-27T18:55:51+5:30

२०१७च्या काही चित्रपटाची नावं तुम्हाला देत आहोत, निवडा त्यापैकी तुमचा आवडता चित्रपट आणि जिंका आकर्षक बक्षिसं.

Lokmat Best bollywood Movie of 2017 | #BestOf2017 : २०१७ च्या तुमच्या आवडत्या चित्रपटाला मत द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसं

#BestOf2017 : २०१७ च्या तुमच्या आवडत्या चित्रपटाला मत द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसं

Next
ठळक मुद्दे पाहता पाहता २०१७ हे वर्ष संपत आलंय आणि शेवटचे काही दिवस उरले आहेत. आम्हीसुध्दा तुमच्यासमोर बॉलिवूडच्या काही गोष्टी मांडणार आहोत.तुम्हाला संधी आहे यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरविण्याची आणि त्यासाठी आकर्षक भेटवस्तु जिंकण्याची.

मुंबई : पाहता पाहता २०१७ हे वर्ष संपत आलंय आणि शेवटचे काही दिवस उरले आहेत. आपल्यापैकी प्रत्येकालाच हे वर्ष संमिश्र स्वरुपाचं गेलं असणार. दरवर्षीप्रमाणे या वर्षभरात आपण काय काय केलं आणि काय काय करणं राहून गेलं याचा हिशोब मांडण्याचं काम सध्या सर्वांनी हाती घेतलं आहेच तर आम्हीसुध्दा तुमच्यासमोर बॉलिवूडच्या काही गोष्टी मांडणार आहोत. सोबतच तुम्हाला संधी आहे यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरविण्याची. त्यासाठी या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून आलेल्या ४ चित्रपटांच्या यादीतून तुमच्या आवडत्या चित्रपटाला मत द्या. जिंकलेल्या चित्रपटाला मत देणाऱ्यांपैकी एका भाग्यवान विजेत्याला मिळेल लोकमतकडून आकर्षक भेटवस्तु. चला तर मग, लवकर मत द्या तुमच्या आवडत्या चित्रपटाला.

१) बाहुबली २

हा चित्रपट बॉक्सऑफीसवर खऱ्या अर्थाने बाहुबली ठरला. एप्रिलच्या शेवटी आलेल्या या चित्रपटाची लोकं आतुरतेने वाट पाहत होते. बाहुबली या पहिल्या भागाच्या झालेल्या रंजक शेवटामुळे दुसऱ्या भागाची उत्सुकता लोकांच्या मनात लागून राहीली होती. ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा’ याचं उत्तर मिळाल्यानंतरही अनेकांनी हा चित्रपट पुन्हा पुन्हा चित्रपटगृहात जाऊन पाहिला. लेखनापासून संगीतापर्यंत सर्वच विभागांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा चित्रपट अजूनही अनेकजण पुन्हा पुन्हा पाहतात. कोणतेही मोठे स्टार नसताना हा चित्रपट कमाईचे जागतिक विक्रम मोडून गेला.

अभिनेते - प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटीया.

दिग्दर्शक - एस. एस. राजामौली.

२) हिंदी मिडीयम

इरफान खानचा चित्रपट म्हणजे चाणाक्ष प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. मे महिन्यात आलेल्या या चित्रपटाने एका गंभीर विषयाला हात घातला होता. आजच्या स्पर्धेत तग धरून राहावीत म्हणून पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी कशी मेहनत घेतात, हे या चित्रपटात रंगवण्यात आलंय. इरफान खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री साबा कमर यांनी त्या पालकांची भूमिका उत्कृष्टरित्या निभावली आहे. आपल्या मुलीला हिंदी मिडीयममध्ये अॅडमिशन घेऊन द्यायचं की पॉश, हायफाय शाळेत यात गोंधळलेल्या पालकांची कथा या चित्रपटात रंगवली आहे.

अभिनेते - इरफान खान, सबा कमर , अमृता सिंग

दिग्दर्शक - साकेत चौधरी

३) काबील

अंध जोडप्याची भूमिका निभावत ह्रतिक रोशन आणि यामी गौतम काबील चित्रपट घेऊन आले. जानेवारी २०१७ मधला हा पहिला बिग बजेट आणि स्टार अभिनेते असलेला चित्रपट होता. संगिताची बाजू कमकुवत असली तरी ह्रतिकच्या चाहत्यांना ‘मोहेंजोदरो’नंतर काहीतरी चांगलं बघायला मिळालं होतं. एक व्यंग असलं तरी आपल्या आवाजाच्या ताकदीवर तो आपल्या पत्नीच्या आत्महत्येचा बदला कसा घेतो, ही त्या चित्रपटाची कथा आहे. बॉक्स ऑफीसवर याचा सामना किंग खानच्या ‘रईस’शी झाल्याने शाहरुखचा गल्ला थोडा कमी जमला. मात्र फक्त बॉक्स ऑफीसवरच्या कमाईचा विचार न करता टीकाकारांचा विचार केला तर काबील चित्रपटाने पुन्हा एकदा दोघांना ‘काबील ए तारीफ’ म्हणून सिध्द केले.

अभिनेते - ह्रतिक रोशन, यामी गौतम

दिग्दर्शक - संजय गुप्ता

४) न्युटन

मोजकेच पण चांगले चित्रपट करणाऱ्या राजकुमार रावचा न्युटन हा चित्रपट टीकाकारांना भलताच आवडला. हे वर्ष राजकुमार रावला तसं छान गेलं. त्याचे 5 चित्रपट येऊन गेले, यावर्षी त्याने मसाला चित्रपटात काम करण्याची हौस भागवून घेतली. सप्टेंबरमध्ये आलेला हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार जिंकून गेला. एक सरकारी कर्मचारी कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय एक निवडणूक लढवायचा प्रयत्न करतो आणि त्यात त्याला काय अडथळे हे या चित्रपटात चित्रीत केलं आहे.

अभिनेता - राजकुमार राव

दिग्दर्शक - अमित मसूरकर

Web Title: Lokmat Best bollywood Movie of 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.