लोकमत आपल्या दारी ज़ोड... ४

By Admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:35+5:302015-02-14T23:50:35+5:30

कुत्र्यांची भीती...

Lokmat ji dhari jodi ... 4 | लोकमत आपल्या दारी ज़ोड... ४

लोकमत आपल्या दारी ज़ोड... ४

googlenewsNext
त्र्यांची भीती...
कचर्‍यात उष्टे अन्न व खरकटे टाकले जाते. ते खाण्यासाठी येथे कायम मोकाट कुत्र्यांचा वावर असतो. लहान मुले घरासमोर खेळत असतात. कुत्रे अंगावर धावून येत असल्याने काम सोडून लहान मुलांवर लक्ष ठेवावे लागत आहे. कुत्र्यांमुळे रात्रीच्या वेळी तर घराबाहेर फिरणे अवघड झाले आहे. कुत्र्यांमुळे महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे, असे अंजली अडसूळ यांनी सांगितले.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे...
सिडको महानगरातील रस्त्याचे काम अर्धवटच करण्यात आले आहे. काही रस्ते अल्पावधीतच उखडले आहेत. अधिकारी व ठेकेदाराने मिलीभगत करून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे, असा नारायण हातोळे यांचा आरोप आहे.
पाणी येत नाही...
सिडकोने पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकली आहे. तरीही पाणी मिळत नाही. नळाला कमी दाबाने पाणी येत असल्याने केवळ चार-पाच हंडेच पाणी मिळते. पाईपलाईन फुटल्याने घाण पाणी येत आहे, असे सुधा खंडाळे यांचे म्हणणे आहे.
सेवाकर दुप्पट, मात्र सुविधा नाहीत..
सिडको प्रशासन विविध सेवाकरांच्या नावाखाली सक्तीने दुप्पट कर वसुली करीत आहे. मात्र, सुविधा कोणत्याच पुरवीत नाही. रस्ते, पाणी, स्वच्छता, ड्रेनेज आदी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत, असे मारुती गायकवाड यांनी सांगितले.
नागरी वसाहतीत विकासकामे करावीत...
नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. परंतु सिडको प्रशासन आलेल्या विकास निधीतून नागरी वसाहत सोडून वसाहत नसलेल्या ठिकाणी रस्त्यावर विकास निधी खर्च करीत आहे. प्रशासनाने विकास निधीचा वापर नागरी वसाहतीत करावा व नागरी समस्या सोडवाव्यात, असे नागेश कुठारे यांचे म्हणणे आहे.
(जोड आहे.. )

Web Title: Lokmat ji dhari jodi ... 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.