लोकमत महाराष्ट्रात सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र - शिवराज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 06:50 PM2017-07-19T18:50:32+5:302017-07-20T03:50:36+5:30
लोकमत वृत्तपत्र दिवसेंदिवस प्रगती करत असून लोकमतच्या संस्थापकांसोबतही मला काम करण्याची संधी मिळाली, असे माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील म्हणाले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - लोकमत वृत्तपत्र दिवसेंदिवस प्रगती करत असून महाराष्ट्रात सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र आहे, असे माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी सांगितले. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते.
लोकमतच्या संस्थापकांसोबतही मला काम करण्याची संधी मिळाली आहे. लोकमत हे महाराष्ट्रात सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र असून यामध्ये छापून येणारा मजकूरही विश्वासार्ह आहे. कोणावरही विनाकारण टीका किंवा कोणाचीही स्तुती लोकमत वृत्तपत्रातून केली जात नाही. तसेच, टीव्ही मीडियासारखी ते एकांगी भूमिका मांडत नाही. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी भाषेतूनही लोकमतचे वृत्तपत्र प्रसिद्ध होते, असे शिवराज पाटील म्हणाले.
लोकमत संसदीय पुरस्कारप्राप्त खासदारांना देशाच्या विकासासाठी केलेल्या कामाचा बहुमान मिळाला आहे. तसेच, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सुद्धा योग्य प्रकारे स्वतःची जबाबदारी पार पाडली आहे. ब-याचदा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता आपण मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. लोकमत संसदीय पुरस्कारसाठी मला बोलावल्याबद्दल लोकमत परिवार, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि त्यांच्या सहका-यांचा मी आभारी आहे. पुरस्कारप्राप्त खासदार अशाच प्रकारे स्वतःच्या कार्याचा गौरव करत राहतील, याची अपेक्षा आहे, असेही शिवराज पाटील यावेळी म्हणाले.
लोकमतच्या या सोहळ्यास उपराष्ट्रपती अन्सारींव्यतिरिक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच.डी. देवेगौडा, अर्थमंत्री अरुण जेटली, माजी नगरविकासमंत्री व उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी व माजी लोकसभाध्यक्ष शिवराज पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याला शरद पवार, फारुख अब्दुल्ला, जया बच्चन हेसुद्धा उपस्थित होते.