Lokmat National Conclave: ईडी, सीबीआय दोन दिवस आमच्याकडे देऊन बघा...; आपच्या राघव चढ्ढांचे भाजपाला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:40 PM2023-03-14T12:40:54+5:302023-03-14T12:59:21+5:30
लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत होत आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्याने 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे.
राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन देशविरोधी बोलणे चुकीचे होते. तुम्ही संसदेच्या बाहेर या आणि बोला, परंतू देश मजबूत करण्याऐवजी परदेशात वक्तव्ये करणे चुकीचे आहे, असे मत आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी व्यक्त केले. याचबरोबर चढ्ढा यांनी भाजपाच्या भ्रष्टाचाराविरोधातील दुटप्पी भूमिकेवरही भाष्य केले.
भारत हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही? नेपाळ, पाकिस्तानचं उदाहरण देत दिग्विजय सिंह यांचं स्पष्टीकरण
लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत होत आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्याने 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. 'भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ' (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडत आहेत.
कर्नाटकमध्ये भाजपा आमदाराच्या घरात करोडो रुपये सापडले. त्याला अटक झाली नाही. त्या आमदाराला जामिन दिला गेला. या आमदाराने त्यानंतर ढोलताशांमध्ये हजारो कार्यकर्त्यांसोबत रॅली काढली. दुसरीकडे सिसोदियांकडे काहीच सापडले नाही, त्यांच्या पत्नीकडे, त्यांच्या जुन्या घरीही काही सापडले नाही. तरी त्यांना तुरुंगात पाठविले गेले अशी टीका चढ्ढा यांनी केली.
सीबीआयने २०१४ पासून २०२२ पर्यंत आठ वर्षे जेवढे खटले दाखल केलेत त्यापैकी ९५ टक्के खटले हे विरोधकांवर दाखल झालेले आहेत. ही भ्रष्टाचाराविरोधातील लढाई नाहीय, तर भारतातील विरोधकां विरोधातील आहे. सत्येंद्र जैन, सिसोदिया जर आज भाजपात गेले तर ते दुसऱ्या क्षणाला बाहेर येऊ शकतील की नाही. सुवेंदू अधिकारी, आसामचे एक नेते अशी अनेक उदाहरणे आहेत, असे चढ्ढा म्हणाले.
मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनीही सीबीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दोन दिवसांसाठी ईडी, सीबीआय आमच्या ताब्यात द्या, मग बगा, असे आव्हान राघव चढ्ढा यांनी भाजपाला दिले आहे. याचबरोबर पंजाबमधील प्रश्नावर बोलताना त्यांनी तेथील परिस्थितीवर भाष्य केले. पंजाबमध्ये आमचे सरकार बनले तेव्हा आम्हाला वारशामध्ये खूप काही मिळाले होते. पंजाबमध्ये शांती कायम करण्यासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे. पंजाबमध्ये त्याला धक्का लागू देणार नाही.