Lokmat National Conclave: प्रियंका गांधींचे पद्मच्या बदल्यात पेंटिंगचे मॉडेल जगात शिकविले जातेय; मोदींच्या मंत्र्याने प्रश्नांवर प्रश्न विचारले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 03:34 PM2023-03-14T15:34:50+5:302023-03-14T15:41:48+5:30
प्रियंका यांना मी कालपासून प्रश्न विचारतोय, आजपर्यंत त्यांनी उत्तर दिले नाही. गांधी परिवाराने परदेशात एका व्यक्तीवर खर्च केला, त्याची माहिती देशाला नको का, असा सवालही ठाकुर यांनी केला.
1984 मध्ये देशात काय घडले होते. काँग्रेसचे नेते देशभर दंगली घडवत होते. हजारो शीख मारले गेले. कित्येक महिलांवर बलात्कार झाले. मोदींनी या घटनेवर चौकशी बसविली. यापूर्वी कोणी तसे करू शकला नव्हता. देशात सर्वजण सुरक्षित आहेत. देशात देशाची चर्चा करा, परदेशात देशाची चर्चा करू नका, असे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सांगायचे आहे असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत होत आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्याने 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. 'भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ' (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडत आहेत.
प्रियंका गांधी यांनी तर पद्मही विकला होता. प्रियंका यांनी पेटिंग विकून करोडोंची कमाई केली. प्रियंका यांना मी कालपासून प्रश्न विचारतोय, आजपर्यंत त्यांनी उत्तर दिले नाही. गांधी परिवाराने परदेशात एका व्यक्तीवर खर्च केला, त्याची माहिती देशाला नको का, असा सवालही ठाकुर यांनी केला.
एफएटीएफच्या अहवालानुसार प्रियंका यांची पेटिंग दोन कोटींना विकत घेण्यासाठी एका मंत्र्याने बँकरवर दबाव टाकला होता. या लोकांचा पद्मभूषण काढून घ्यायचा नाही का, की त्यांना भारतरत्न द्यायचा, असा सवालही ठाकूर यांनी केला. ठाकूर यांनी राहुल गांधीवरही भडीमार केला.
प्लॅनिंग कमिशनला म्हटले पंच ऑफ जोकर, मनमोहन सिंगांनी तो अपमान कसा गिळला असेल. राहुल गांधींनी भारताचा, संसदेचा, सैन्याचा अपमान केला ठीक आहे. पण त्यांनी गांधींचाही केला. त्यांच्यासाठी इंदिरा म्हणजे भारत, भारत म्हणजे इंदिरा असे होते, असा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. तरुण वर्गाला ठाकूर यांनी राहुल गांधींनी माफी मागावी की नाही असा प्रश्न विचारला. यावर श्रोत्यांमधून हो माफी मागायला हवी असे, उत्तर आले.