'लोकमत' देशात 'एक नंबर'; IRS नुसार अव्वल मराठी वृत्तपत्राचा मान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 05:35 PM2019-04-26T17:35:16+5:302019-04-26T17:36:22+5:30
'लोकमत'ची लोकप्रियता वाढता वाढता वाढत असल्याचं सिद्ध झालं आहे.
'पत्रकारिता परमो धर्मः' हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र व्यापून टाकणारं आणि देश-विदेशातील खबरबात वाचकांपर्यंत पोहोचवणारं 'लोकमत' हे पुन्हा एकदा देशातील अव्वल क्रमांकाचं मराठी वर्तमानपत्र ठरलं आहे. इंडियन रीडरशिप सर्व्हेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 'लोकमत'ची लोकप्रियता वाढता वाढता वाढत असल्याचं सिद्ध झालं आहे. आपल्या सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे 'वाचकाच्या सर्वाधिक पसंतीचं मराठी दैनिक' हे मानाचं बिरूद 'लोकमत'नं टिकवून ठेवलं आहे.
१ कोटी ९७ लाख वाचकसंख्येच्या पाठबळावर संपूर्ण भारतात सर्व भाषेतील दैनिकांमध्ये 'लोकमत' हा पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. मराठी भाषेतील दैनिकांमध्ये लोकमत हे देशातील सर्वाधिक वाचलं जाणारं वृत्तपत्र असून दुसऱ्या क्रमांकावरील मराठी दैनिकाच्या तुलनेत 'लोकमत'ची वाचकसंख्या तब्बल ७८ लाख ५० हजारांनी अधिक आहे.