थरुर, पात्रा, हरसिमरत कौर बादल, सरोज पांडे यांना ‘लोकमत’ संसदीय पुरस्कार; दिल्लीत सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 08:30 IST2024-02-06T08:30:04+5:302024-02-06T08:30:42+5:30
मनेका गांधी, रामगोपाल यादव यांना जीवनगौरव; ‘धर्म आणि जातींमध्ये गुरफटली लोकशाही’वर रंगणार परिसंवाद

थरुर, पात्रा, हरसिमरत कौर बादल, सरोज पांडे यांना ‘लोकमत’ संसदीय पुरस्कार; दिल्लीत सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सर्वात विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित ‘लोकमत’ संसदीय पुरस्कारांचा पाचवा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी, ६ फेब्रुवारीला दिल्लीत केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. फारुक अब्दुल्ला, डॉ. सुभाष कश्यप, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहतील.
यंदाच्या ‘लोकमत’ संसदीय पुरस्कारांसाठी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये राज्यसभेतील समाजवादी पक्षाचे नेते प्रा. रामगोपाल यादव, बिजू जनता दलाचे डॉ. सस्मित पात्रा, भाजपच्या सरोज पांडे आणि माकपचे जॉन ब्रिटास तसेच लोकसभेतील खासदार डॉ. शशी थरुर, माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल आणि बसपचे कुंवर दानिश अली यांची २०२३ मधील त्यांच्या योगदानासाठी निवड करण्यात आली आहे.
‘लोकमत’ संसदीय पुरस्कारांसाठी विजेत्यांची निवड करण्यासाठी ज्युरी मंडळाने लोकसभा तसेच राज्यसभेतील सर्व खासदारांच्या २०२३ या वर्षातील कामगिरीचा अभ्यास केला.
कुठे आणि किती वाजता समारंभ?
कधी : मंगळवार,
६ फेब्रुवारी, २०२४
केव्हा : दुपारी ४ वाजता
कुठे : डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जनपथ रोड, नवी दिल्ली