Lokmat Parliamentary Awards: लोकमत संसदीय पुरस्कार: असदुद्दीन ओवेसींना मिळाला सर्वोत्कृष्ट संसदपटुचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 07:23 PM2023-03-14T19:23:24+5:302024-02-06T11:26:54+5:30
Lokmat Parliamentary Awards 2022: असदुद्दीन ओवैसी 2004 पासून सातत्याने हैदराबादमधून खासदार म्हणून निवडून येत आहेत.
Lokmat Parliamentary Awards 2022: लोकमत संसदीय पुरस्काराच्या चौथ्या आवृत्तीचा पारितोषिक वितरण सोहळा आज नवी दिल्लीत पार पडला. यावेळी देशाचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना या वर्षातील सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल असदुद्दीन ओवेसी यांनी आनंद व्यक्त केला. लोकसभेचे खासदार ओवेसी हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहतात. ते अनेकदा भाजपसह इतर राजकीय पक्षांवरही उघडपणे भाष्य करतात. सध्या केंद्रात भाजपचे सरकार असल्याने अनेकवेळा त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
ओवेसी यांचा परिचय
असदुद्दीन ओवेसी यांचा जन्म 13 मे 1969 रोजी हैदराबादमध्ये झाला होता. असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमधून शिक्षण पूर्ण केले असून ते व्यवसायाने बॅरिस्टर आहेत. याशिवाय त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर ते ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहलदुल मुस्लिमीनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ओवेसी पहिल्यांदा 2004 मध्ये हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009 आणि 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते हैदराबाद मतदारसंघातून खासदार म्हणूनही निवडून आले.
लोकमत संसदीय पुरस्कार 2022 चे विजेते
जीवनगौरव
मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा
भर्तृहरी मेहताब, बिजू जनता दल
सर्वोत्कृष्ट संसदपटू
असदुद्दीन ओवैसी, एआयएमआयएम
डेरेक ओ'ब्रायन, तृणमूल काॅंग्रेस
सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू
वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस
लॉकेट चॅटर्जी, भाजप
सर्वोत्कृष्ट नवोदित संसदपटू
तेजस्वी सूर्या, भाजप
प्रा. मनोजकुमार झा, आरजेडी