Lokmat Parliamentary Awards: देशातील इतर माध्यम समूहांनीही 'लोकमत'सारखी परंपरा जोपासायला हवी- माजी राष्ट्रपती Ramnath Kovind
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 08:21 PM2023-03-14T20:21:42+5:302023-03-14T20:24:02+5:30
लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते.
Lokmat Parliamentary Awards: लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या कार्यक्रमातील प्रमुख भाषणात सर्व पुरस्कार विजेत्या खासदारांचे अभिनंदन केले. यावेळी माजी राष्ट्रपती कोविंद म्हणाले, "सर्व पुरस्कार विजेत्या संसद सदस्यांनी त्यांच्या ज्ञानाने आणि बुद्धी व वाक्चातुर्याने संसदीय प्रतिष्ठा समृद्ध केली आहे आणि इतर संसद सदस्यांसमोर एक अनुकरणीय उदाहरण ठेवले आहे. मला हे जाणून आनंद होत आहे की लोकमत समूह संसदीय पुरस्कारासोबतच देशातील सर्वोत्कृष्ट सरपंचांचाही पुरस्कार देतो. देशातील इतर माध्यम समूहांनीही खासदार, आमदार आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा जोपासायला हवी.
भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणारे हे राज्यसभा खासदार आहेत ‘लोकमत संसदीय पुरस्कार 2022’ चे मानकरी!@MPVandanaChavan@manojkjhadu@kharge@derekobrienmp#LokmatParliamentaryAwards@RajendrajDarda@vijayjdardapic.twitter.com/wNWdAk7Gll
— Lokmat (@lokmat) March 14, 2023
"देशातील इतर माध्यम समूहांनीही खासदार, आमदार आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा जोपासायला हवी. देशातील जनतेला विशेषतः गरीब जनतेला लोकप्रतिनिधींकडून खूप आशा आहेत. आपल्या लोकप्रतिनिधींकडून आपले जीवन चांगले व्हावे, अशी देशातील जनतेची अपेक्षा आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही लोकशाहीची कसोटी आहे. खरे तर ग्रामसभा, विधानसभा आणि संसदेतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे एकच प्राधान्य असायला हवे, ते देशहित आणि राष्ट्रहितासाठी काम करणे. सर्व पुरस्कार विजेत्यांच्या अतुलनीय योगदानामागे हाच आत्मा असावा," असे कोविंद म्हणाले.
आपल्या प्रतिभेने आणि ज्ञानाने लोकसभेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणारे हे लोकसभा खासदार आहेत ‘लोकमत संसदीय पुरस्कार 2022’ चे मानकरी!@asadowaisi@BhartruhariM@me_locket@vijayjdarda@RajendrajDarda#LokmatParliamentaryAwardspic.twitter.com/MSf7L5T82w
— Lokmat (@lokmat) March 14, 2023
यावेळी व्यासपीठावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा आणि लोकमत समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा उपस्थित होते.