लोकमत पोल: बहुसंख्य वाचकांना वाटतंय भारत विकासाचं बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2016 02:20 PM2016-03-01T14:20:18+5:302016-03-01T14:39:46+5:30

अरूण जेटलींच्या 'बजेट'बद्दल वाचकांचे मत जाणून घेण्यासाठी 'लोकमत' ने घेतलेल्या पोलला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Lokmat Poll: A majority of readers believe the budget for India's development | लोकमत पोल: बहुसंख्य वाचकांना वाटतंय भारत विकासाचं बजेट

लोकमत पोल: बहुसंख्य वाचकांना वाटतंय भारत विकासाचं बजेट

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १ - ग्रामीण भारत, शेतकरी, महिला, दलित व आदिवासींचा कैवार घेत 'कॉर्पोरेटकडून खेड्याकडे' मार्गक्रमणा करणारे बजेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी काल सादर केले. त्यांच्या या अर्थसंकल्पाबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत असल्या तरी 'लोकमत'च्या अनेक वाचकांना मोदी सरकारचे हे तिसरे बजेट अतिशय चांगले वाटले आहे. ऑनलाइन पोलमधल्या २९ टक्के सहभागींनी बजेटला पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. तर 28 टक्के सहभागींनी 10 पैकी 8 गुण दिले आहेत. त्यामुळे बहुसंख्य वाचकांना हे बजेट भारताला विकासाच्या दिशेने नेणारे आहे, असं वाटत असल्याचं म्हणता येईल.
' बजेट २०१६' या विशेष कॅटॅगरीद्वारे सोमवारी आम्ही अर्थसंकल्पाचं लाइव्ह कव्हरेज व बजेटचा सर्वसामान्यांवर होणारा परिणाम लवकरात लवकतर पोचवण्याचा प्रयत्न केला. लाईव्ह अपडेट्स, विश्लेषणात्मक बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतानाच या बजेटबद्दल त्यांची मतं जाणून घेण्यासाठीच आम्ही एक 'पोल'ही घेतला. जेटलींच्या बजेटला किती गुण द्याल आणि हे बजेट कसे वाटले असा सवाल विचारत आम्ही देशातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्या प्रतिक्रिया खुलेपणाने मांडण्याची संधी या पोलद्वारे दिली. वाचकांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत 500 पेक्षा जास्त वाचकांनी या पोलमध्ये सहभाग घेतला आणि जेटलींच्या बजेटबाबत मोकळेपणानं मतं मांडली. 29 टक्के सहभागींनी बजेटला १० पैकी १० गुण देत जेटलींचे कौतुक केले. तर २० टक्के सहभीगू वाचक असेही होते, ज्यांना या अर्थसंकल्पातील तरतुदी मुळीच रुचल्या नाहीत आणि त्यांनी या बजेटला अवघे २ गुण दिले. मात्र तसे करतानाही त्यांनी फक्त नाव न ठेवता बजेटमध्ये अनेक सुधारणा सुचवत सर्वसामान्य जनतेच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षाही स्पष्ट केल्या.
प्रॉव्हिडंट फंड काढताना लागू करण्यात आलेला कर, मध्यमवर्गीयांच्या टॅक्स स्लॅबमध्ये न झालेली वाढ, शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव तरतुदीचा अभाव अशा अनेक व्यथा वाचकांनी मांडल्या. या सर्व प्रतिक्रिया व पोल बघण्याची सोय आम्ही करून देत असून त्याची लिंक खाली दिली आहे.
 
काय आहे लोकमतच्या वाचकांचा कौल? 
दिलेले गुण (१० पैकी)वाचक संख्याएकूण टक्केवारी
       २  ११२ २०.९७% 
       ४   ४६  ८.६१ %
       ६    ६५ १२.१७ %
       ८   १५४ २८.८३%
       १०   १५५ २९.०३ %
 
वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया
> जितेंद्र माशरकर : अरुण जेटलींजी देशात आर्थिक आणि सामाजिक समानता आणण्यासाठी प्रयत्न केलेले बजेट
> अनिल जगताप : Made for India. This is finest budget for common Indians. Finance minister have avoided flashy announcements and kept well balance between rural and infrastructural development.
> सुभाष पांडे : Nice budget for poor people.
> धम्मदीप गायकवाड : गॅस सोडून गरिबांसाठी दुसरं काय?
> कपिल चौधरी : Overall Budget in Average but good outcome for agriculture section.
> नील : Nothing is done for the tax payers. Everyone has to pay tax but no relief from other taxes. NO change in Medical and LTA amount. It should increase.Its a very good expample of very bad and unsatisfactory budget.
> श्रीकांत लांडगे : Very good. Farmer centric as required.
> मनीष वानखेडे : Finance Minister need to re-calibrate and rethink on the expectation of Service class people, who pays income tax promptly from their Hard Earned money. BJP government is not thinking about middle class people. This budget is disappointing to our expectation.
> संदीप : Very Good and Balance Budget
> राजेश : This is a really good budget for considering all sectors equally. This budget is good for rural and urban development. Overall its a good budget for considering last couple of years budget.
 
'लोकमत पोल'वरील सर्व प्रतिक्रिया वाचा इथे...

 

Web Title: Lokmat Poll: A majority of readers believe the budget for India's development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.