लोकमत सखी आज राष्ट्रपतींना भेटणार, मुंबईत ‘राजभवन’वर रंगणार सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 06:51 AM2024-09-03T06:51:33+5:302024-09-03T06:51:49+5:30

Lokmat Sakhi will meet the President today: लोकमत सखी मंचचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २५ कर्तृत्ववान सखी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना आज, मंगळवारी सायंकाळी राजभवन येथे भेटणार आहेत.

Lokmat Sakhi will meet the President Draupadi Murmu today, the ceremony will be held at the 'Raj Bhavan' in Mumbai | लोकमत सखी आज राष्ट्रपतींना भेटणार, मुंबईत ‘राजभवन’वर रंगणार सोहळा

लोकमत सखी आज राष्ट्रपतींना भेटणार, मुंबईत ‘राजभवन’वर रंगणार सोहळा

 मुंबई - लोकमत सखी मंचचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २५ कर्तृत्ववान सखी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना आज, मंगळवारी सायंकाळी राजभवन येथे भेटणार आहेत. महिलांच्या सबलीकरण व सर्वांगीण विकासाठी लोकमत सखी मंच महाराष्ट्रात गेली २५ वर्षे काम करत आहे. 

घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळण्यापासून ते विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाने स्वतःची वेगळी छाप समाजमनावर निर्माण करणाऱ्या सखींना मुंबईत राजभवन येथे राष्ट्रपतींसोबत होणारी विशेष भेट आशीर्वादपर सन्मान देणारी ठरेल, असे सांगून लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा म्हणाले, ‘सखी मंच’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘लोकमत’च्या वतीने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याची सुरुवातच महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत २५ सखींच्या भेटीने होत आहे, हा सखी मंचसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.

Web Title: Lokmat Sakhi will meet the President Draupadi Murmu today, the ceremony will be held at the 'Raj Bhavan' in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.