लोकमत ‘सूर ज्योत्स्ना’ आज दिल्लीत रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 02:37 IST2019-04-26T02:36:55+5:302019-04-26T02:37:39+5:30
निझामी बंधूच्या सुफी गीतांची मैफल

लोकमत ‘सूर ज्योत्स्ना’ आज दिल्लीत रंगणार
नवी दिल्ली : ‘लोकमत सूर ज्योत्स्ना’ हा कार्यक्रम शुक्रवारी जंतरमंतरवरील एनडीएमसी कन्व्हेंशन सेंटरवर होणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष संगीत साधक स्व. ज्योत्स्नादेवी दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सायं. ७ वा. होणाऱ्या या कार्यक्रमात सुविख्यात निझामी बंधूंची सुफी सांगीतिक सफर प्रेक्षकांना अनुभवता येईल.
या कार्यक्रमात ‘सूर ज्योत्स्ना २०१९’ च्या पुरस्काराचे मानकरी आर्या आंबेकर (पुणे) व शिखर नाद कुरेशी (मुंबई) हे कलाकारही स्वरसाज चढविणार आहेत. कार्यक्रमाचे हे सहावे पर्व आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा हे अध्यक्षस्थानी राहतील. सेलो प्रस्तुत ‘लोकमत सूर ज्योत्स्ना’ या कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स इंडस्ट्रिज लि.च्या सहयोगाने करण्यात आले आहे. कार्यक्रम निमंत्रितांसाठी आहे.