लोकमत आपल्या दारी ज़ोड.. २
By Admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:01+5:302015-02-14T23:52:01+5:30
नागरिकांच्या प्रतिक्रिया...
न गरिकांच्या प्रतिक्रिया...कचर्याची व्यवस्था दूर करावी..सध्या स्वाईन फ्लूची साथ सुरूआहे. घराशेजारीच कचराकंुड्या ठेवल्या आहेत. कचरा लवकर उचलला जात नाही. कचर्यावर डुकरं सारखे फिरतात. दुर्गंधी व डास वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने कचरा संकलनाची व्यवस्था नागरी वसाहतीपासून दूर करावी, असे राजेश टाकळकर यांनी सांगितले. पोलीस चौकी सुरू करावी...सिडकोतील पोलीस चौकी अनेक महिन्यांपासून बंद आहे. रात्रीला पोलीस गस्त घालत नाहीत. चौकी बंद असल्याने चोर्यांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. चौकी नावालाच असून, ती तात्काळ सुरू करणयाची मागणी शेषराव पवार यांनी केली आहे. खेळण्याचे मैदान साफ करावे...देवगिरीनगरातील मैदानावरच कचरा व टाकाऊ वस्तू टाकल्या जात आहेत. कचराकुंड्याही ठेवल्या आहेत. मुलांना खेळायला जागा नाही. सोसायटीतील नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रमही घेता येत नाही. चार वेळा सिडकोला पत्र दिले आहे. परंतु काहीच झाले नाही. प्रशासनाने मैदान साफ करून द्यावे, असे नागेश कुकलारे यांचे म्हणणे आहे.टवाळखोर मुलांचा त्रास....बंद पोलीस चौकीजवळ रात्रीच्या वेळी कायम टवाळखोर मुले दारू, सिगारेट पीत बसतात. महिला व मुलींना पाहून अश्लील बोलतात. त्यामुळे महिला व मुलींना त्रास सहन करावा लागत असून, येथून ये-जा करणे अवघड झाले आहे. अशा मुलांचा बंदोबस्त करावा. पोलीस चौकी सुरू केल्यास असे प्रकार थांबतील, असे छाया कुकलारे यांनी सांगितले. (जोड आहे)