लोकमतचा उपक्रम: विद्यार्थ्यांनी लुटला पहिल्या विमान प्रवासाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 01:59 AM2017-08-06T01:59:39+5:302017-08-06T01:59:47+5:30
लोकमत बालविकास मंच आणि लोकमत कॅम्पस क्लबच्या उपक्रमांतर्गत दीड लाख विद्यार्थ्यांमधून भाग्यशाली ठरलेल्या ५१ जणांनी दिल्लीची हवाई सफर केली.
नवी दिल्ली : लोकमत बालविकास मंच आणि लोकमत कॅम्पस क्लबच्या उपक्रमांतर्गत दीड लाख विद्यार्थ्यांमधून भाग्यशाली ठरलेल्या ५१ जणांनी दिल्लीची हवाई सफर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हंसराज अहीर यांच्याशी भेट व फोटोसेशन यामुळे त्यांच्या आंनदाला पारावार उरला नाही.
बालविकास मंच व लोकमत कॅम्पस क्लबद्वारे दरवर्षी चिठ्ठीद्वारे भाग्यशाली ठरलेल्या विद्यार्थ्यांना दिल्लीची हवाई सफर घडवण्यात येते. यंदा ५१ विद्यार्थ्यांत २२ मुली होत्या. दुसरी ते दहावीपर्यंचे विद्यार्थी होते. गुरुवारी नागपूर व मुंबईहून विमानाने मुले दिल्लीत आली. बहुतांश मुलांचा पहिला विमानप्रवास होता. काही विद्यार्थ्यांचे पालक गरीब, कष्टकरी, अल्प भूधारक शेतकरी आहेत. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, संसद भवन परिसर, राजपथ, जनपथ, रेल म्युझियम, इंिदरा गांधी मेमोरियल, महात्मा गांधी स्मारक, रेल भवनला त्यांनी भेटी दिल्या. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी रेलभवनमध्ये मुलांची जेवणाची उत्तम सोय केली. रेल भवनमधील लालबहादुर शास्त्रीपासून तर विद्यमान रेल्वेमंत्र्यांच्या फोटांची माहिती त्यांना देण्यात आली.
सुरेश प्रभू यांच्या अनुपस्थितीत आयएएस खासगी सचिव डॉ.विजयमूर्ती पिंगळे यांनी मुलांशी संवाद साधला. नाशिक व औरंगाबादच्या मुलांनी पुणे व नागपूरप्रमाणे आमच्याकडे मेट्रो का नाही? असे प्रश्न केले. एकाने वर्धा-यवतमाळ- नांदेड ही रखडलेली ट्रेन सुरू होणार की नाही? असा प्रश्न विचारला. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानीही मुलांचा भेटीचा योग आला. गडकरींनी कौतुकाने त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. खूप मोठे व्हा, परिश्रम करा, याच दिल्लीत तुम्ही महत्वाच्या जबाबदाºया पार पाडणार आहात, असे आशीर्वाद दिले. गडकरी यांच्या घरासमोरील १० जनपथ हे सोनिया गांधींचे निवासस्थान दाखवताच मुलांना आश्चर्य वाटले. विजय चौकात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या मुलांसोबत फोटो काढून घेतले. राजपथ आणि इंडिया गेट दाखवत ना. अहीर यांनी प्रजासत्ताक दिनाचे संचलन इथेच होते, त्यात तुम्हीही सहभागी होऊ शकाल, असे सांगितले. जिद्द ठेवा, आयुष्यात खूप संधी उपलब्ध आहेत असा मंत्रही दिला. दिल्लीत प्रचंड उकाडा असल्याने लोकमतने वातानुकुलीत बसमधून मुलांना दिल्लीचे दर्शन घडविले, त्यामुळे त्यांचा उत्साह कायम होता. रात्री विमानाने ही मुले मुंबई व नागपूरकडे रवाना झाली. लोकमतचे ब्युरो चीफ शिलेश शर्मा आणि लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांचे स्वीय सचिव प्रवीण भागवत यांनी मुलांना सर्व स्थळांची मािहती दिली. लोकमत कनेक्टचे महाराष्ट्र व गोवा आॅपरेशन हेड नितीन नौकरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी दिल्लीत पोहचले. लोकमत कनेक्टचे अधिकारी निकीता शिवहरे , नूतन शिंदे, दीपक मनातकर, शैलेश देशमुख, अमोल या सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेतली.
हवाई सफरीत अहमदनगर जिल्ह्यातील
सुजल धाडगे, आचल कर्डिले, चैत्राली काळे, औरंगाबादचे भक्ती महामुनी, निलय दौलताबादकर, ओम गाडेकर, पुष्पक शेजुल, ज्ञानेश्वरी शिंदे, ऋषिकेष गरजे, श्रावणी भालकीकर, तरल महाजन, जळगाव जिल्ह्यातील वैभव सुरवाडे, मानव जोशी, प्रतीक निकवाडे, कोल्हापूर जिल्ह्याचे विश्वजित शेवाळे, रणवीर पाटील, हर्ष संगार, धनराज खाडे, सार्थक हराळे, राजवर्धन पाटील, हर्ष बजारे, नांदेडचे अमेय बासरकर, गोविंद मुंगल, शिवम बारसे,
नाशिक जिल्ह्याचे आदित्य राठी, अथर्व भोसले, श्रेया दराडे, अपूर्वा वाघ, शौर्या पवार,
स्पंदन कवाडे, पुणे जिल्ह्यातून कावेरी हुले, स्वानंद सोरते, सोलापूरचे सृष्टी बोरला,
श्रृती उपाध्ये, पायल सूर्यवंशी, अकोला जिल्ह्यातून आयुष बुलबुले, अभिनीत राठोड,
माही टपके, शामली गावंडे, अमरावती जिल्ह्यातून साक्षी वानखेडे, नागपूर विभागातून त्रिवेणी बोंदरे, पियुष अडे, जिज्ञासा झाडे,
समीर ठाकरे, राम केवटे, अथर्व कोलते, पलक सेलुकर, हरिष पगारावार, शिवाणी धाईत यांचा समावेश होता. लोकमत बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी लवकरच सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.