भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला गांधीनगर; मताधिक्याचा नवा विक्रम अमित शाह नोंदविणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 10:18 AM2024-04-27T10:18:36+5:302024-04-27T10:23:59+5:30
दरवेळी विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याची अडवाणी यांची परंपरा अमित शाह यांनीही कायम ठेवली
विनय उपासनी
मुंबई : गुजरातची राजधानी गांधीनगर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अभेद्य असा बालेकिल्ला. १९८९ पासून ताे काँग्रेसला भेदता आलेला नाही. याचा पाया रचला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी. मधल्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनीही या मतदारसंघाचे औटघटकेचे प्रतिनिधित्व केले होते,
दरवेळी विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याची अडवाणी यांची परंपरा अमित शाह यांनीही कायम ठेवली. गेल्यावेळी शाह साडेपाच लाख मताधिक्याने जिंकले. यंदा काँग्रेसने सदस्य सोनल पटेल यांना येथून उमेदवारी दिली आहे. त्या काही काळ काँग्रेसच्या महिला विभागाच्या पश्चिमी राज्यांच्या प्रमुख हाेत्या.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
या ठिकाणी प्रचारात विकासाचे मुद्दे प्रभावी ठरतात. अमित शाह यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात अनेक प्रभावी योजना राबविल्या आहेत. आता आणखी विकासकामे करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. काँग्रेसकडून वाढती महागाई, बेरोजगारी, इलेक्टोरल बॉण्ड हे मुद्दे प्रचारात अधोरेखित केले जात आहेत.
२०१९ मध्ये काय घडले?
अमित शाह
भाजप (विजयी)
८,९४,०००
चतुरसिंह चावडा
काँग्रेस (पराभूत)
३,३७,६१०