Lok Sabha Election 2024: भाजपाचा जबरदस्त गेमप्लान! २०१९ ला पराभूत झालेल्या १४४ जागांसाठी आखली खास रणनिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 01:47 PM2022-06-29T13:47:27+5:302022-06-29T13:48:14+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी भले जवळपास दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला तरी भाजपानं जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.

loksabha election 2024 bjp lost 144 seats in 2019 and they have plan to bounce back | Lok Sabha Election 2024: भाजपाचा जबरदस्त गेमप्लान! २०१९ ला पराभूत झालेल्या १४४ जागांसाठी आखली खास रणनिती

Lok Sabha Election 2024: भाजपाचा जबरदस्त गेमप्लान! २०१९ ला पराभूत झालेल्या १४४ जागांसाठी आखली खास रणनिती

Next

नवी दिल्ली-

लोकसभा निवडणुकीसाठी भले जवळपास दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला तरी भाजपानं जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने याआधीच सर्व खासदारांना 100 कमकुवत बूथ आणि आमदारांना 25 कमकुवत बूथ ओळखून त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची जबाबदारी दिली होती. आता भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात गमावलेल्या १४४ जागा जिंकण्याच्या दृष्टीने रणनीती तयार करण्यासाठी एक टीम तयार केली आहे. या टीममध्ये उत्तर प्रदेशमधील बस्तीचे खासदार हरीश द्विवेदी, उत्तराखंडचे राज्यसभा खासदार नरेश बन्सल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना पक्षाने जबाबदारी दिली आहे. यामध्ये यूपीमधील 14 जागांची जबाबदारी उत्तराखंडचे राज्यसभा खासदार नरेश बन्सल यांच्याकडे देण्यात आली आहे.

भाजपने देशातील १४४ गमावलेल्या जागांची यादी काढली आहे. या जागा जिंकण्यासाठी पक्षाध्यक्षांनी एक टीम तयार केली आहे जी सर्व राज्यांमध्ये जाऊन या जागा जिंकण्यासाठी विशेष रणनीती आखणार आहे. राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याकडे या सर्व जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

१४ जागांवर लक्ष
उत्तराखंडचे राज्यसभेचे खासदार नरेश बन्सल यांच्याकडे उत्तर प्रदेशातील 14 जागा जिंकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या सध्या विरोधकांकडे आहेत. या जागांवर भाजपचा पराभव होण्याची कारणं जाणून घेणं ते या जागांवर बूथ मजबूत करण्यासाठी काय काय करता येईल यासाठी काम करण्यात येणार आहे.

नरेश बन्सल उत्तर प्रदेशात
लखनौमध्ये गमावलेल्या जागांवर बैठक होणार आहे. ज्यामध्ये नरेश बन्सल यांच्यासह प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि संघटन मंत्री सुनील बन्सल यांचा सहभाग असणार आहे. याशिवाय सर्व 14 लोकसभा मतदारसंघांच्या प्रभारींनाही या बैठकीत बोलावण्यात आले आहे. याआधी भाजपने आपल्या सर्व खासदारांना 100 कमकुवत बूथ आणि आमदारांना 25 कमकुवत बूथ ओळखून त्यावर काम करण्याची जबाबदारी दिली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मिशन मोडमध्ये २०१४ साठीची तयारी सुरू केली आहे.

Web Title: loksabha election 2024 bjp lost 144 seats in 2019 and they have plan to bounce back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.