Loksabha Election 2024: ‘२०२४मध्ये भाजप जिंकेल ३५०हून अधिक जागा’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 07:30 AM2023-04-18T07:30:04+5:302023-04-18T07:30:52+5:30

Loksabha Election 2024: २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५०हून अधिक जागा जिंकेल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केला. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपद बनतील, असेही ते म्हणाले. 

Loksabha Election 2024: 'BJP will win more than 350 seats in 2024' | Loksabha Election 2024: ‘२०२४मध्ये भाजप जिंकेल ३५०हून अधिक जागा’

Loksabha Election 2024: ‘२०२४मध्ये भाजप जिंकेल ३५०हून अधिक जागा’

googlenewsNext

रांची : २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५०हून अधिक जागा जिंकेल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केला. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपद बनतील, असेही ते म्हणाले. 

झारखंडमध्ये ते रविवारी आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, भ्रष्टाचारी नेते देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेचा पंतप्रधान मोदी यांना भरभक्कम पाठिंबा आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांत भाजपला मोठा विजय मिळणार आहे. 

चौबे यांनी सांगितले की, झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजवटीत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. या राज्यातील कायदा-सुव्यवस्था स्थिती ढासळली आहे. सोरेन यांचे सरकार लोकांच्या हिताविरोधात काम करत आहे. या सरकारच्या काळात राज्यामध्ये बलात्काराचे ५ हजार गुन्हे नोंदविण्यात आले तसेच हत्येची ५२५८ प्रकरणे घडली आहेत. झारखंडमध्ये हत्ती आणि मानवातील संघर्ष वाढला आहे. त्याबद्दल अश्विनीकुमार चौबे यांनी चिंता व्यक्त केली.

Web Title: Loksabha Election 2024: 'BJP will win more than 350 seats in 2024'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.