निवडणूक प्रचारात लहान मुलांना नो एन्ट्री; निवडणूक आयोगाने जारी केली नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 03:53 PM2024-02-05T15:53:15+5:302024-02-05T15:53:53+5:30
नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात बालमजुरी कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.
LokSabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने निवडणूक एक पत्रक जारी केले. यात लहान मुले आणि अल्पवयीन मुलांना निवडणूक प्रचारात सहभागी न करण्याच्या कडक सूचना जारी केल्या आहेत. लहान मुले किंवा अल्पवयीनांनी प्रचार पत्रिका वाटताना, पोस्टर्स चिकटवताना, घोषणाबाजी करताना किंवा पक्षाचे झेंडे आणि बॅनर घेऊन फिरताना दिसू नये, असे यात सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, मुलांना निवडणुकीशी संबंधित कामात किंवा निवडणूक प्रचाराच्या कामात सहभागी करुन घेणे खपवून घेतले जाणार नाही. या सूचनांमध्ये लहान मुलांना कोणत्याही प्रकारच्या राजकीय प्रचारात, मग ते कविता वाचण, गाणी, घोषणा इत्यादींमध्ये सामील न करण्यास सांगितले आहे.
Election Commission of India has issued strict directives regarding use of children in any election-related activities. Political parties have been advised not to use children in election campaigns in any form whatsoever including distribution of posters/pamphlets or to… pic.twitter.com/aEiFWwzZpE
— ANI (@ANI) February 5, 2024
आयोगाने म्हटले की, कोणत्याही पक्षाने त्यांच्या निवडणूक प्रयत्नांमध्ये मुलांचा सहभाग असल्याचे आढळले, तर बालमजुरीशी संबंधित सर्व कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. याबाबत कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी व रिटर्निंग अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, मुलगा त्याच्या पालकांसोबत तिथे असेल, तर याला मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन मानले जाणार नाही.