जोवर मोदी आहे, तोवर धक्का लागू देणार नाही...; तामिळनाडूत पंतप्रधानांची तोफ धडाडली!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 04:04 PM2024-03-15T16:04:11+5:302024-03-15T16:04:55+5:30
पंतप्रधान म्हणाले, राजधानी दिल्लीमध्ये संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली. या नव्या इमारतीत आम्ही तामिळ संस्कृतीचे प्रतीक आणि या भूमीचे वरदान असलेल्या पवित्र सेंगोलची स्थापना केली. मात्र, या लोकांनी त्यावर बहिष्कार टाकला. सेंगोलची स्थापना त्यांना आवडली नाही.
हे लोक शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत. तमिळनाडूला बदनाम करत आहेत. जल्लीकट्टूवर बंदी असतानाही डीएमके आणि काँग्रेस गप्प होते. या लोकांना तामिळ संस्कृती नष्ट करायची आहे. हे आमचे सरकार आहे, एनडीएचे सरकार आहे. ज्याने जल्लीकट्टू उत्सव पूर्ण उत्साहात साजरा करण्याचा मार्ग मोकळा केला. जल्लीकट्टू ही तामिळनाडूची शान आहे. जोवर मोदी आहे, तोवर येथील संस्कृतीला धक्का लागणार नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीएमके आणि काँग्रेससह विरोधकांच्या I.N.D.I.A. वर जबरदस्त हल्ला चढवला. ते तामिळनाडूत बोलत होते.
येथे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम दाखविण्यावर बंदी घालल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. राज्यातील डीएमके सरकारवर बरसताना मोदी म्हणाले, मी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी येथे आलो होतो. मी येथील प्राचीन तीर्थ स्थळांचे दर्शन केले होते. मात्र, डीएमकेने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ बघण्यावरही बंदी घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तामिलनाडू सरकारला फटकारले होते. तमिलनाडूतील सत्ताधारी डीएमके सध्या I.N.D.I.A. चा भाग आहे.
संसदेत सेंगोल स्थापित केले... -
पंतप्रधान म्हणाले, राजधानी दिल्लीमध्ये संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली. या नव्या इमारतीत आम्ही तामिळ संस्कृतीचे प्रतीक आणि या भूमीचे वरदान असलेल्या पवित्र सेंगोलची स्थापना केली. मात्र, या लोकांनी त्यावर बहिष्कार टाकला. सेंगोलची स्थापना त्यांना आवडली नाही.
'डीएमके तामिळनाडूचा शत्रू' -
पंतप्रधान मोदी म्हणाले, द्रमुक हा केवळ तामिळनाडूच्या भविष्याचाच शत्रू नाही, तर तामिळनाडूच्या भूतकाळाचा आणि वारशांचाही शत्रू आहे. I.N.D.I.A. तामिळनाडूचा विकास करू शकत नाही, असा आरोप त्यांनी केला. या लोकांना घोटाळ्यांचा इतिहास आहे. या लोकांच्या राजकारणाचा आधार जनतेला लुटण्यासाठी सत्तेवर येणे हा आहे. एकीकडे भाजपच्या कल्याणकारी योजना आहेत, तर दुसरीकडे कोट्यवधींचे घोटाळे आहेत, असेही मोदी म्हणाले.