युट्यूबर मनिष कश्यप भाजपात प्रवेश करणार; बिहारमध्ये NDA च्या प्रचारात उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:18 AM2024-04-25T10:18:55+5:302024-04-25T10:19:44+5:30
मनिष एक यशस्वी YouTuber म्हणून ओळखले जातात. त्यांच्या YouTube वर ८.७५ मिलियन सब्स्क्राईबर्स आहेत.
पटणा- Manish Kashyap BJP ( Marathi News ) बिहारमधील प्रसिद्ध युट्यूबर मनिष कश्यप भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेणार आहे. मनिष आज दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पोहचतील. बिहारमधील पश्चिम चंपारण जागेवर मनिष कश्यप लोकसभा निवडणूक लढवू इच्छितात. परंतु भाजपा प्रवेशानंतर ते निवडणुकीला उभं राहणार नसल्याचं सांगतात. Son of Bihar मनिष कश्यप यांनी पश्चिम चंपारण जागेवर प्रचाराला सुरुवात केली होती. ते अपक्ष निवडणुकीत उभे राहणार होते. परंतु आता त्यांनी हा निर्णय बदलत भाजपात प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
२०२० च्या सुरुवातीला कश्यम यांनी बिहारच्या चनपटिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकही लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. बेतिया जिल्ह्यातील रहिवासी मनिष कश्यप हे प्रसिद्धीच्या झोतात आले जेव्हा त्यांना पोलिसांनी बनावट व्हायरल व्हिडिओ प्रकरणात अटक केली. मनिष यांना तब्बल नऊ महिने तुरुंगात काढावे लागले. याशिवाय, मनिष एक यशस्वी YouTuber म्हणून ओळखले जातात. त्यांच्या YouTube वर ८.७५ मिलियन सब्स्क्राईबर्स आहेत. बिहारशी संबंधित अनेक सामाजिक मुद्द्यांवर ते अनेक वर्षांपासून व्हिडिओ बनवत आहेत.
का झाली होती अटक?
दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात बिहारच्या मजुरांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ मनिष कश्यप यांनी शेअर केला होता. तो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवली. त्यात बिहार पोलिसांकडे हे प्रकरण आले.
जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मनिष कश्यम अज्ञातवासात होते. पोलिसांनी मनिषच्या घरी तपास केला असता स्थानिक पोलीस ठाण्यात मनिष यांनी सरेंडर केले. त्यानंतर पोलिसांनी मनिष कश्यपला अटक करून तामिळनाडू पोलिसांकडे सुपूर्द केले. या प्रकरणी जवळपास ९ महिने मनिष कश्यप जेलमध्ये होते.