‘एक्झिट पोल’मुळे उडाली खळबळ; ट्विट हटविण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 06:10 AM2019-05-17T06:10:33+5:302019-05-17T06:11:03+5:30
अनेक लोकांनी तर ती सारी माहिती व त्या वाहिनीवर चुकून दाखविलेले सारे चित्रणच ट्विटरवर प्रसारित केले.
नवी दिल्ली : मतदानाचा शेवटचा टप्पा संपताच वृत्तवाहिन्यांवरून दाखविण्यात येणाऱ्या मतदानोत्तर चाचण्यांचा (एक्झिट पोल) काही भाग चुकून एका वाहिनीवर दिसला. काँग्रेस प्रणीत आघाडी, भाजप प्रणीत आघाडी यापैकी कोणालाच बहुमत मिळणार नाही आणि अन्य पक्षांना सर्वाधिक जागा मिळतील, असे वाहिनीवर दिसल्याने राजकीय पक्षांतही खळबळ उडाली. त्या दिवशीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना चुकीने ते आकडे दाखविण्यात आले.
अनेक लोकांनी तर ती सारी माहिती व त्या वाहिनीवर चुकून दाखविलेले सारे चित्रणच ट्विटरवर प्रसारित केले. मतदान संपण्यापूर्वी एक्झिट पोल वा त्यातील कोणताही मजकूर प्रकाशित व प्रसारित करण्यास बंदी असताना हे घडल्याने निवडणूक आयोगही जागा झाला. नंतर आयोगाच्या सूचनेनुसार ट्विटरने संबंधित मजकूर, चित्रण काढून टाकले.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर १९ मे रोजी संध्याकाळी मतदान संपल्यानंतर दाखविण्याच्या एक्झिट पोलच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू असताना, चुकीने तो भाग प्रसारित झाला होता. त्यात ५४२ पैकी कोणत्या आघाडीला किती आणि अन्य पक्षांना किती जागा मिळतील, असे स्पष्टपणे दिसत होते. त्यातील आकडे
खरे आहेत की, तयारीसाठी काहीतरी
डमी आकडे टाकले होते, हे मात्र समजू शकले नाही.