बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 01:47 PM2024-05-29T13:47:49+5:302024-05-29T13:48:48+5:30

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रत्येकजण वेगवेगळे दावे करत आहेत. त्यात भाजपा नेते अमित शाह यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

Loksabha Election Result: How many seats will BJP get in Bengal, Delhi, Odisha and Telangana?; Amit Shah told the figure | बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला

बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला

नवी दिल्ली - Amit Shah on Result ( Marathi News ) लोकसभा निवडणूक निकालासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निकालाबाबत मोठा दावा केला आहे. भाजपा यंदा पूर्व आणि दक्षिण भारतात बहुतांश जागा जिंकतील असं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी अमित शाह यांनी राज्यनिहाय आकडे दिले आहेत. 

अमित शाह म्हणाले की, आम्हाला पश्चिम बंगालमध्ये जास्त जागा मिळत आहेत. त्याठिकाणी ४२ पैकी २४ ते ३० जागा जिंकू शकतो. ओडिशा २१ पैकी १७ जागा आम्हाला मिळू शकतात. ओडिशा विधानसभा निवडणुकीत १४५ पैकी ७५ जागा जिंकण्याचं आमचं टार्गेट असल्याचं त्यांनी सांगितले. तर तेलंगणात भाजपाला १७ पैकी १० जागा मिळतील. आंध्र प्रदेशात आमच्या आघाडीचं सरकार बनणार आहे. त्याठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या निकालातही आम्हाला जास्त जागा मिळतील असा दावा त्यांनी केला. 

तसेच पूर्वेकडील बंगाल, झारखंड, बिहार, ओडिशा या राज्यात आम्ही सर्वात मोठा पक्ष बनत आहोत हे निश्चित आहे. इतकेच नाही तर दक्षिणेकडील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू याठिकाणीही भाजपाला इतर पक्षांपेक्षा सर्वात जास्त जागा मिळतील. दिल्लीतील सर्व ७ जागांवर आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ असंही अमित शाह यांनी मुलाखतीत दावा केला आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान, जेव्हा आम्ही २०१४ मध्ये पूर्ण बहुमताचा नारा दिला होता. तेव्हा दिल्लीत बसलेले विश्लेषक हे शक्य नाही असं सांगत होते. परंतु आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं. २०१९ च्या निवडणुकीत भाजपानं ३०० प्लसचा नारा दिला होता. तेव्हाही अनेकांनी हे होणार नाही असं म्हटलं. त्यामुळे यंदा आम्ही अबकी बार ४०० पार करू तेव्हा पुढील निवडणुकीपर्यंत हे लोक आमच्यावर विश्वास ठेवू लागतील असा टोला विरोधकांना लगावला आहे. 

देशातील जनतेचा मोदींवर विश्वास

जर निवडणुकीच्या प्रचाराबाबत एका वाक्यात सांगायचं झालं तर, भारतातील जनता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर भारत योग्य दिशेने जात असल्याचं मानते. याच मार्गाने देशाला सर्वोच्च स्थानावर पोहचवलं जाऊ शकतं. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. 

Web Title: Loksabha Election Result: How many seats will BJP get in Bengal, Delhi, Odisha and Telangana?; Amit Shah told the figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.