मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 06:27 PM2024-06-08T18:27:19+5:302024-06-08T18:27:59+5:30

loksabha Election Result - सलग तिसऱ्यांदा देशात एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. तत्पूर्वी मोदींच्या कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी लागणार याबाबत दिल्लीच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

loksabha Election Result - Who will get a chance from Maharashtra in Narendra modi cabinet for upcoming nda government | मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?

मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?

नवी दिल्ली - येत्या ९ जूनला सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला जगभरातील पाहुण्यांसह ९००० जण उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी पंतप्रधान आणि काही कॅबिनेट मंत्री शपथ घेतील. या सोहळ्यासाठी बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशससह अन्य देशातील नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. मोदी तिसऱ्यांदा शपथ घेण्यापूर्वी त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

त्यातच मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यानुसार, यात काही माजी मंत्री आणि नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. घटक पक्षातील टीडीपी, जेडीयू, आरएलडी, शिवसेना, राष्ट्रवादी, अपना दल, एलजेपी पक्षातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे घटक पक्षांना सोबत घेत भाजपाला सरकार चालवावं लागणार आहे. एनडीएत कोणाला कोणती खाती देणार याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी बैठकही पार पडली आहे. 

मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपाचे हे नेते बनू शकतात मंत्री

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात भाजपाकडून राजनाथ सिंह, अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, एस जयशंकर, महेश शर्मा, एसपी सिंह बघेल, अनुराग ठाकूर, पीयूष गोयल, मनसुख मंडाविया, नित्यानंद राय, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत, राजीव प्रताप रुडी, शिवराज सिंह चौहान यांची नावे आघाडीवर आहेत. त्याशिवाय ज्योतिरादित्य शिंदे, वीरेंद्र कुमार खटीक, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव, सुरेश गोपी, विप्लब देब, सर्वानंद सोनेवाल, प्रल्हाद जोशी, शोभा करंदजले, पीसी मोहन, नारायण राणे, श्रीपाद नाईक यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. 

घटक पक्षातील या नेत्यांना संधी

आरएलडी - जयंत चौधरी
एलजेपी - चिराग पासवान
जेडीएस - कुमारस्वामी
टीडीपी - राम मोहन नायडू, के रविंद्र कुमार
एनसीपी - प्रफुल्ल पटेल
आजसू - चंद्र प्रकाश चौधरी
अपना दल सोनेलाल - अनुप्रिया पटेल
जेडीयू - रामनाथ ठाकूर, दिलावर कामत, ललन सिंह
शिवसेना - श्रीकांत शिंदे किंवा प्रतापराव जाधव
 

Web Title: loksabha Election Result - Who will get a chance from Maharashtra in Narendra modi cabinet for upcoming nda government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.