Coron Virus : कोरोना इफेक्ट! 6 महिन्यांपूर्वी संसर्ग पण अजुनही उभं राहणं अवघड...; तरुणीचा भयंकर अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 03:37 PM2023-01-13T15:37:47+5:302023-01-13T15:47:44+5:30
Coron Virus : लाँग कोविड हा कोविडचा दीर्घकाळ टिकणारा प्रभाव आहे जो महिनोनमहिने टिकून राहतो.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांसाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या लाँग कोविडची लक्षणे त्रासदायक ठरू शकतात. ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे जी संसर्गानंतर लगेच प्रभावित होऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेनेही याची दखल घेतली आहे. रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनाची लागण झालेल्या लोकसंख्येपैकी 10-20 टक्के लोकांमध्ये ही स्थिती विकसित होऊ शकते. कोविड-19 चे नवीन व्हेरिएंट, ज्यात वेगाने कोरोना पसरण्याचा धोका जास्त आहे, त्यामुळे आरोग्य संस्था आणि तज्ञांची चिंता वाढली आहे.
यूट्यूबर डियाना काउअर्नने ट्विटरवर कोरोनाबद्दल अशी एक गोष्ट शेअर केली, जी वाचून लोक हैराण झाले आहेत. आपल्या ट्विटमध्ये डियानाने "मला सहा महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता. आजही मला उभं राहून आंघोळ करता येत नाही. व्हिडीओ कॉल करू शकत नाही. पुस्तके वाचता येत नाहीत. गाडी चालवता येत नाही. पण तरीही मी बरं होण्यासाठी ही लढाई लढत आहे" असं म्हटलं आहे.
6 months ago today, I got COVID
— Dianna Cowern (@thephysicsgirl) January 10, 2023
Today I can’t shower standing up.
Can’t do video calls.
Can’t read books.
Can’t drive.
But I’m still fighting to recover. 🥲
डियानाच्या ट्विटला जवळपा 34 हजार लोकांनी लाईक केले असून 2600 हून अधिक लोकांनी ते रिट्विट केलं आहे. डियाना ही एक सायन्स कम्युनिकेटर आहे आणि ती फिजिक्स गर्ल या नावाने यूट्यूब चॅनल चालवते. ज्याची सुरुवात तिने 2011 मध्ये केली होती. या चॅनेलमध्ये, ती प्रयोग आणि शोधांद्वारे फिजिकल सायन्स समजावून सांगते. डियानाच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
अनेक लोक या समस्येचा करताहेत सामना
अनेकांचे म्हणणे आहे की त्यांनाही याच समस्येचा सामना करावा लागत आहे. एका ट्विटर युजरने लिहिले आहे की, मला पूर्णपणे बरे व्हायला दोन वर्षे लागली. लाँग कोविड हा कोविडचा दीर्घकाळ टिकणारा प्रभाव आहे जो महिनोनमहिने टिकून राहतो. यामध्ये निद्रानाश, थकवा यासारखी अनेक लक्षणे असू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"