दीर्घायुष्यासाठी बलात्कारी बाबा शेकडो महिलानां करायला लावत होता करवा चौथ व्रत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 11:54 AM2017-10-08T11:54:28+5:302017-10-08T11:54:46+5:30
बलात्कारी बाबा रामरहीमला अटक झाल्यानंतर त्याच्या क्रौर्याच्या नवनव्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या आहेत. आज करवा चौथ आहे.
नवी दिल्ली - बलात्कारी बाबा रामरहीमला अटक झाल्यानंतर त्याच्या क्रौर्याच्या नवनव्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या आहेत. आज करवा चौथ आहे. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत तुरुंगात आहेत. प्रत्येक वर्षी आजच्या दिवशी बाबा रामरहीम आपल्या डेरामध्ये करवा चौथ साजरा करत असे. पण यावर्षी तुरुंगात असल्यामुळे त्याला करवा चौथ साजरा करण्यात येणार नाही. पोलिसांना बाबाच्या सर्व डेऱ्याला कुलुप ठोकलेले आहेत. डेऱ्यातील शेकडो महिला करवा चौथ व्रत करत असे. करवा चौथ हा महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी करत असतात. पण डेऱ्यात बाबा महिलांना आपल्यासाठी हा व्रत ठेवायला लावत असे.
प्रत्येकवेळी बाबा रामरहीम डेरामध्ये करवा चौथ साजरा करत असे. यावेळी डेऱ्यातील शेकडो महिला करवा चौथचा व्रत करत असे. गुरमीत डेऱ्यातील महिलांच्या पित्याप्रमाणे असूनही त्यांना करवा चौथ करायला लावत असे. करवा चौथ हा महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी करत असतात. पण डेऱ्यामध्ये महिला बाबासाठी व्रत ठेवत असे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, बाबा रामरहीम आपल्या दिर्घायुष्यासाठी डेऱ्यातील महिलांना हे व्रत धरायला लावत असे. त्याचप्रमाणे शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलींनाही तो वृत धरायला लावत असे. बलात्कारी बाबा रामरहीमला अटक झाल्यानंतर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये सामुहिक स्तरावर बाबा आपल्या समर्थक महिलांनी धरलेला करवा चौथ व्रत सोडवताना दिसत आहे.
रामरहीमच्या डेऱ्यात नपुंसक केले जायचे?
रामरहीमच्या डेऱ्यात महिलांवर अत्याचार केले जायचेच, पण पुरुषांचीही मोठ्या प्रमाणावर नसबंदी करून त्यांना नपुंसक केलं जायचं. ऑपरेशन करून त्यांचे अंडकोष काढून घेतले जायचे,' अशी थरकाप उडविणारी माहिती उघडकीस आली आहे. रामरहीमचा कायदेविषयक सल्लागार अॅड. दान सिंह आणि पीए राकेश कुमार यांनी पोलीस चौकशीत ही माहिती दिली आहे.