ब्रह्मपुत्रा नदीवरील सर्वात लांब पूलाचे २६ मे रोजी उद्घाटन

By Admin | Published: May 15, 2017 05:42 AM2017-05-15T05:42:51+5:302017-05-15T05:42:51+5:30

भारतातील नदीवरील सर्वात लांब पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ मे रोजी होणार आहे.

The longest bridge on Brahmaputra river inaugurated on May 26 | ब्रह्मपुत्रा नदीवरील सर्वात लांब पूलाचे २६ मे रोजी उद्घाटन

ब्रह्मपुत्रा नदीवरील सर्वात लांब पूलाचे २६ मे रोजी उद्घाटन

googlenewsNext

दिब्रुगढ : भारतातील नदीवरील सर्वात लांब पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ मे रोजी होणार आहे. आसामच्या दिब्रुगढ जिल्ह्यात ढोला व सादियादरम्यान ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला हा पूल ९.१५ कि.मी. लांबीचा असून, त्यासाठी ९५० कोटी रुपये खर्च आला आहे.
याच दिवशी मोदी सरकारलाही तीन वर्षे पूर्ण होत आहेत, हे विशेष. भारत-चीन सीमेवर होत असलेला हा पूल म्हणजे भारताच्या संरक्षणविषयक पायाभूत सुविधांत सुधारणांच्या दृष्टीनेही याकडे पाहिले जात आहे. मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकहून हा पूल तिप्पट लांबीचा आहे.

Web Title: The longest bridge on Brahmaputra river inaugurated on May 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.