लोणी काळभोरला लक्ष्मीपूजनानिमित्त कार्यक्रम
By admin | Published: October 30, 2016 10:46 PM2016-10-30T22:46:51+5:302016-10-30T22:46:51+5:30
लोणी काळभोर : हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीतील लक्ष्मीपूजनानिमित्त येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
Next
ल णी काळभोर : हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीतील लक्ष्मीपूजनानिमित्त येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत दीपोत्सव साजरा करण्यात आला. लक्ष्मीपूजनानिमित्त लोणी काळभोरचे (ता. हवेली) ग्रामदैवत असलेल्या श्रीमंत अंबरनाथ मंदिरात दीपोत्सवाबरोबरच अंबरनाथाची जोतिबामहाराज स्वरूपात तर जोगेश्वरी मातेची महालक्ष्मी स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती. पहाटे श्रींना महामस्तकाभिषेक करण्यात आला. त्या वेळी रुद्राभिषेकही करण्यात आला. त्यानंतर जोतिबा व महालक्ष्मीस्वरूपात पूजा बांधण्यात आली. बर्याच वर्षांनंतर लक्ष्मीपूजन रविवारी आल्यामुळे ही विशेष पूजा बांधण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी गणपत भैरवकर व नाना भैरवकर यांनी दिली. रविवार असल्याने आज दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. रात्री आठच्या सुमारास श्रीमंत अंबरनाथाची रविवारची नेहमीची महाआरती करण्यात आली. (वार्ताहर) फोटो - लोणी काळभोर (ता. हवेली) : लक्ष्मीपूजनानिमित्त येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची जोतिबामहाराज व माता जोगेश्वरीची महालक्ष्मीस्वरूपात पूजा बांधण्यात आली होती.