केंद्रातील मंत्र्यांवर करडी नजर

By admin | Published: June 14, 2015 02:26 AM2015-06-14T02:26:49+5:302015-06-14T02:26:49+5:30

गोपनीय माहिती मिळविण्यात तरबेज मानले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या त्यांच्याच मंत्रिमंडळातील सदस्यांना आपले लक्ष्य बनविले आहे.

Look at the central ministers | केंद्रातील मंत्र्यांवर करडी नजर

केंद्रातील मंत्र्यांवर करडी नजर

Next

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
गोपनीय माहिती मिळविण्यात तरबेज मानले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या त्यांच्याच मंत्रिमंडळातील सदस्यांना आपले लक्ष्य बनविले आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या इशाऱ्यावरून पंतप्रधान कार्यालयातर्फे (पीएमओ) सर्व मंत्रालयांशी संलग्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (पीएसयू) एक गोपनीय पत्र पाठविण्यात आले आहे. एखाद्या मंत्रालयाने सरकारी उपक्रमाकडून कुठल्याही प्रकाराचा लाभ अथवा सुविधा मागितली असल्यास त्यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी सविस्तर माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळविण्याचे निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत.
मुळात पंतप्रधान कार्यालयातर्फे केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांची ‘कुंडली’तयार करण्यात येत आहे. संबंधित मंत्र्यांची इत्थंभूत माहिती यात असणार आहे. मंत्र्यांवर दबाव आणि अंकुश ठेवण्यासाठी हा गोपनीय अहवाल तयार केला जात असल्याची माहिती आहे. सरकारचे मंत्री सरकारी उपक्रमाकडून किती गाड्यांचा वापर करतात, निवासस्थान आणि कार्यालयाच्या सौंदर्यीकरणावर त्यांनी किती खर्च केला; याशिवाय जेवणाखाण्याची व्यवस्था, शिपाई, दौरे आदींवर मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला खर्च याची आकडेवारी पीएमओने मिळविली आहे. संबंधित मंत्र्याने दबाव आणून किती निर्णय घेतले याबाबत माहिती मिळविणे सर्वाधिक धक्कादायक आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांचे पुत्र मंत्रिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप झाला तेव्हाच सर्वप्रथम हा मुद्दा प्रकाशात आला होता.

Web Title: Look at the central ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.