परमेश्वर गोदरेज यांचे निधन

By admin | Published: October 11, 2016 11:58 AM2016-10-11T11:58:32+5:302016-10-11T14:08:10+5:30

गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदि गोदरेज यांची पत्नी परमेश्वर गोदरेज यांचे सोमवारी निधन झाले.

Lord Godrej passes away | परमेश्वर गोदरेज यांचे निधन

परमेश्वर गोदरेज यांचे निधन

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदि गोदरेज यांच्या पत्नी, डिझायनर व समाजसेविका  परमेश्वर गोदरेज यांचे निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७० वर्षांच्या होत्या. 
परमेश्वर गोदरेज या गेल्या ५ वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांचा त्रास वाढल्याने त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णलयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. 
परमेश्वर यांनी एड्स जागृती कार्यक्रमासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरी याच्यासह २००२ साली त्यांनी एड्स विरोधी जनजागृती कार्यक्रमही हाती घेतला होता. तसेच त्यांनी महिला व बालकांच्या आरोग्यसंबंधी क्षेत्रातही काम केले होते. 
 
अभिनेते अनुपम खेर, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान आदी दिग्गजांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
 

Web Title: Lord Godrej passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.