पोपट उडाला भुर्रर्रर्र... मालकाने अन्नपाणी सोडलं, शोधून देणाऱ्यास लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:16 AM2022-02-04T09:16:13+5:302022-02-04T09:17:10+5:30

शहरात पोस्टर-पॉम्प्लेट वाटले, समाजमाध्यमांवर संदेशही पाठवले

Losing a parrot leaves food and water, a reward of lakhs to the one who finds it | पोपट उडाला भुर्रर्रर्र... मालकाने अन्नपाणी सोडलं, शोधून देणाऱ्यास लाखांचे बक्षीस

पोपट उडाला भुर्रर्रर्र... मालकाने अन्नपाणी सोडलं, शोधून देणाऱ्यास लाखांचे बक्षीस

googlenewsNext

सिकर (राजस्थान) : सिकर शहरातील हृदयशस्रक्रियातज्ज्ञ डॉ. व्ही. के. जैन यांचा पोपट ३ दिवसांपासून हरवल्यामुळे त्यांच्या पत्नीने अन्न-पाणी वर्ज्य केले आहे. पोपटाला शोधण्यासाठी डॉक्टरने लाखो रुपयेही खर्च केले. वृत्तपत्रात ‘पोपट हरवला आहे,’ अशी जाहिरातही दिली.

शहरात पोस्टर-पॉम्प्लेट वाटले, समाजमाध्यमांवर संदेशही पाठवले. एवढेच नाही तर हा पोपट शोधून देणाऱ्याला १ लाख रूपये बक्षीस देण्याचीही घोषणा केली. डॉ. जैन यांचे म्हणणे आहे की, कुटुंबातील सदस्य व रुग्णालयाचे कर्मचारी दिवस-रात्र पोपटाला शोधत आहेत. 

Web Title: Losing a parrot leaves food and water, a reward of lakhs to the one who finds it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.