कोरोनाची दोन नवीन लक्षणं; आरोग्य मंत्रालयानं अपडेट केली यादी... जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 06:15 PM2020-06-13T18:15:40+5:302020-06-13T23:10:47+5:30
सध्या एखाद्याची कोरोना चाचणी घेण्यासंदर्भात 13 लक्षणं विचारात घेतली जातात, ज्यात मागील महिन्यातच सुधारणा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली- कोरोनाचं संक्रमण देशात वाढत असल्यानं रुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यातच काही रुग्णांमध्ये लक्षण नसतानाही त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनाच्या नव्या लक्षणांचा यादीत समावेश केला आहे. गंध आणि चव घेण्याची क्षमता कमी झाल्यास तेसुद्धा आता कोरोनाचं लक्षण समजलं जाणार आहे. वास कमी येणे (एनोस्मिया) किंवा चव न लागणे (एग्यूसिया) हीसुद्धा कोरोनाची लक्षणं असल्याचं अधोरेखित केलं आहे. सध्या एखाद्याची कोरोना चाचणी घेण्यासंदर्भात 13 लक्षणं विचारात घेतली जातात, ज्यात मागील महिन्यातच सुधारणा करण्यात आली आहे.
या लक्षणांमध्ये ताप, खोकला, अतिसार, उलट्या होणे, ओटीपोटात वेदना होणे, श्वास घेण्यात अडथळा येणे, शरीरात वेदना होणे, घसा खवखवणे, छातीत दुखणे आणि नाक वाहणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. यापैकी एक किंवा अधिक लक्षणे असलेल्या लोकांना कोरोना चाचणी घेण्यास परवानगी आहे. आता यादीमध्ये चव न लागणे आणि गंध न येणं ही लक्षणं जोडल्यानंतर आता चाचणी घेण्याच्या दृष्टीने 15 क्लिनिकल लक्षणं विचारात घेतली जाणार आहेत.
नॅशनल टास्क फोर्सने या विषयावर चर्चा केली होती, त्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टास्क फोर्समधील चर्चेदरम्यान हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला. कोरोनाच्या बर्याच प्रकरणांमध्ये रुग्णांची वास घेण्याची आणि चव जाणवण्याची क्षमता कमी झाली आहे, म्हणूनच आता ते संसर्गाच्या लक्षणांमध्ये समाविष्ट झाले आहे. पहिल्या लक्षणांमध्ये ताप, कफ, थकवा, श्वास घेण्यात अडचण, खोकला, स्नायू दुखणे, नाक वाहणे, घसा खोकला-अतिसार यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे, ज्या आधारावर कोरोनाची तपासणी केली जात होती. एप्रिलमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अनेक युरोपियन युनियन देश, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासमवेत कोरोनाच्या लक्षणात वाढ केली असून, चव कमी होण्याच्या लक्षणाचाही समावेश केला होता.Loss of smell (anosmia) or loss of taste (ageusia) added to the list of #COVID19 symptoms by the Health Ministry. pic.twitter.com/PM6ZkEkHK4
— ANI (@ANI) June 13, 2020