मुख्य जलवाहिनीच्या गळतीमुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी

By Admin | Published: January 16, 2017 12:44 AM2017-01-16T00:44:22+5:302017-01-16T00:44:22+5:30

जळगाव : शहराला पाणीपुरवठा वाघुरच्या मुख्य जलवाहिनीला खोटेनगर स्टॉपजवळ गळती लागली आहे़ चार ते पाच वर्षापासून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने दररोज याठिकाणाहून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ या गळतीमुळे घनशाम नगरात पाणीच जात असल्याने रस्ते खराब झाले असून मोठ-मोठे गवत-झुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ पाहणी करण्या पलीकडे महापालिकेकडून दुसरी कुठलीही कारवाई होत नसल्याने येथील रहिवाश्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत़

Loss of thousands of liters of water due to leakage of the main water channel | मुख्य जलवाहिनीच्या गळतीमुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी

मुख्य जलवाहिनीच्या गळतीमुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी

googlenewsNext
गाव : शहराला पाणीपुरवठा वाघुरच्या मुख्य जलवाहिनीला खोटेनगर स्टॉपजवळ गळती लागली आहे़ चार ते पाच वर्षापासून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने दररोज याठिकाणाहून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ या गळतीमुळे घनशाम नगरात पाणीच जात असल्याने रस्ते खराब झाले असून मोठ-मोठे गवत-झुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ पाहणी करण्या पलीकडे महापालिकेकडून दुसरी कुठलीही कारवाई होत नसल्याने येथील रहिवाश्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत़
राष्ट्रीय महामार्गालगत सौभद्र बंगला ते खोटेनगर स्टॉप दरम्यान मुख्य जलवाहिनीला तीन ते चार ठिकाणी गळती लागली आहे़ यामुळे गळतीचे पाणी थेट घनशाम नगरात येते़ व दररोज हजारो लिटर पाणी पिंप्राळ्यात नाल्यात जात आहे़ यामुळे गळतीच्या ठिकाणी पाणी साठल्याने तलावासारखी परिस्थिती आहे़त्याठिकाणी गवत-झुडपे वाढली आहेत़ त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून मोठ्या प्रमाणावर आजारांचा प्रादुर्भाव होत आहे़ गेल्या वर्षी आजाराची लागण होवून उपचारादरम्यान्य मृत्यू झाला होता़ तसेच एका महिलेला झुडपांमुळे सर्पदंश झाला होता़
आमदारांनी केली पाहणी
आमदार सुरेश भोळे यांनीही रहिवाश्यांच्या तक्रारीवरून संबंधित जलवाहिनी गळतीच्या घटनास्थळाला भेट दिली़ तसेच येथील अभियंत्यांना कामाच्या सुचना दिल्या होत्या़ मात्र तरीही अद्यापर्यंत परिस्थिती जैसे थेच आहे, अशी माहिती रहिवासी कवी प्रभाकर महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली़
लवकरच काम हाती घेवू
येथील रहिवाश्यांनी तोंडी तक्रार केली आहे़ त्यानुसार पाहणी केली होती़ मात्र गळती आढळली नव्हती़ दरम्यानच्या काळात माणसे कमी असल्याने काम करता आले नाही़ मात्र येत्या आठवड्यात परिसरातील नियमितच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करून हे काम हाती घेण्यात येईल - डी़एसख़डके, अभियंता, पाणीपुरवठा विभाग मनपा

Web Title: Loss of thousands of liters of water due to leakage of the main water channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.