काश्मीर खो-यात सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी घडवला IED स्फोट, चार पोलीस शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 11:12 AM2018-01-06T11:12:43+5:302018-01-06T11:25:02+5:30
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार पोलीस शहीद झाले असून एक पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार पोलीस शहीद झाले असून एक पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. या आत्मघातकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांपैकी एक जण अवघ्या 16 वर्षांचा होता.
गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी व्हावी, असा हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणा-या सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला.सूत्रांनुसार, तळावरील निवासी इमारतीमध्ये गाढ झोपेत असलेले जवान या गडबडीने जागे झाले व अनेक जण बाहेर आले.
अंदाधुंद गोळीबार करत, आत शिरलेल्या अतिरेक्यांच्या गोळ्यांनी यापैकी एक जवान जागीच ठार झाला. जखमींपैकी आणखी ३ जवानांना इस्पितळात उपचार सुरू असताना वीरमरण आले, तर एक जवान इसिपतळात नेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने दगावला.काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम उघडली असून त्यात अनेक मोठे दहशतवादी मारले गेले आहेत पण त्याचवेळी दहशतवादीसुद्धा सुरक्षापथकांना टार्गेट करत आहेत.
More #visuals from Baramulla where 4 Policemen have lost their lives after an IED blast by terrorists in Sopore #JammuAndKashmirpic.twitter.com/BLybHzhaFl
— ANI (@ANI) January 6, 2018
#Visuals from Baramulla: 3 Policemen have lost their lives & 2 are seriously injured after an IED blast by terrorists in Sopore #JammuAndKashmirpic.twitter.com/k4TCaLRxx2
— ANI (@ANI) January 6, 2018